नारायण राणेंना बालेकिल्ल्यातच धक्का, 24 वर्ष साथ देणाऱ्या 'या' नेत्याने सोडली साथ

नारायण राणेंना बालेकिल्ल्यातच धक्का, 24 वर्ष साथ देणाऱ्या 'या' नेत्याने सोडली साथ

नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी राणेंची साथ सोडत असल्याचं सांगितलं.

  • Share this:

दिनेश केळुस्कर, कणकवली 30 सप्टेंबर : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का बसलाय. राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वाभीमान पक्षाचा राजीनामा दिलाय. सतीश सावंत राणेंचे गेली 24 वर्षे अत्यंत निकटचे सहकारी होते. सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी राणेंची साथ सोडत असल्याचं सांगितलं. नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाने राणेंना धक्का बसलाय.

सतिश सावंत म्हणाले, नितेश राणेंच्या कार्यपध्दतीवर मी नाराज आहे. नारायण राणेंचा आता माझ्यावर विश्वास राहिलेला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

'अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात, हे सगळं नाटक'

जो पक्ष आपल्या विकास कल्पनांना स्थान देईल, माझ्या कार्यकर्त्याना मान सन्मान देईल त्या पक्षात जाणार आहे. ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन झाला तो उद्देश या पक्षात राहून साध्य होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील वजनदार नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेतली.  तसंच यावेळी नारायणे राणे यांच्या भाजप प्रवेश मुहूर्त ठरला असून 2 ऑक्टोबरला राणे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

पंढरपुरात शरद पवारांचा भाजपला दे धक्का, भालके 'भाजप'ऐवजी 'राष्ट्रवादी'त जाणार

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला गेला. आता अखेर 2 ऑक्टोबरला गरवारे हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता राणे भाजपमध्ये होणार आहेत. राणे यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले नितेश राणे आणि निलेश राणे हेदेखील भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत, अशी माहिती आहे.

नारायण राणे आणि राजकीय वर्चस्वाचा संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात लढणार नाहीत!

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 05:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading