मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तारीख पे तारीख, नारायण राणेंनी सरकार कोसळण्याची सांगितली नवी तारीख

तारीख पे तारीख, नारायण राणेंनी सरकार कोसळण्याची सांगितली नवी तारीख

"हे सरकार आहे, असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटं जातात?", अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली.

"हे सरकार आहे, असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटं जातात?", अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली.

"हे सरकार आहे, असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटं जातात?", अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली.

  • Published by:  Chetan Patil

वाशिम, 19 फेब्रुवारी : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून वारंवार हे सरकार कोसळण्याबाबतची भविष्यवाणी केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्यात सरकार कोसळेल, अशाप्रकारचं विधान केलं होतं. त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीबाबत नवी भविष्यवाणी केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असा नवा दावा नारायण राणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी याआधी असे अनेक दावे आणि तारखा जाहीर केल्या आहेत. पण अद्यापही महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं नाही. याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सरकार आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नारायण राणे यांनी आज वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. "आमच्याकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला वादळ येतं. या वादळात हलणारी झाडं फांद्यांसारखी कोसळून पडतात. हे तीन पक्षांचं एक झाड आहे. या झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री खोडावर नाहीत. ते जून महिन्याच्या आधी जाणार. जय हिंद, जय महाराष्ट्र", अशा शब्दांमध्ये खिल्ली उडवत राणेंनी राज्य सरकार कोसळण्याची नवी तारीख सांगितली.

"हे सरकार आहे, असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटं जातात? एकेदिवशी कॅबिनेटला तीन मिनिटे आले, नंतर शेवटी परत आले. मिटिंग ना बसता सगळे विषय त्यांना माहिती पडतात. अधिवेशनात अंतिम आठवड्यात उत्तर दिलं. कलानगरच्या नाक्यावरचं भाषण विधीमंडळात केलं", असा घणाघात राणेंनी केला.

(सोमेश्वर धबधब्यात पोहणे जीवावर बेतले, डोळ्यादेखत 2 मित्र पाण्यात बुडाले, नाशिकमधील घटना)

नारायण राणे यांना यावेळी पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर राणेंनी राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा सल्ला देत सडकून टीका केली. "संजय राऊतबद्दल प्रश्न विचारु नका. त्यांना मी पत्रकार मानत नाही आणि संपादक तर नाहीच नाही. त्यांची भाषा आणि वैचारिकता बघा. मागे त्यांच्या पत्रकात शिवीगाळ होती. त्यांना बोलायला जागा आहे का? त्यांनी काळ्या पैशाने घेतलेली संपत्ती ईडीने जप्त केली. त्या माणसाला लोकांना शहाणपणा सांगण्याची नैतिकता नाही. मी अशा माणसाला किंमत देत नाही. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. जागा जप्त झाली आहे. वृत्तपत्राच्या संपादकाला किती पगार असतो? तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही रायगड समुद्रकिनारी प्लॉट घेऊ शकता का? नाहीतर व्हा सगळे संपादक. या प्रगतीचं गौडबंगाल काय ते सांगावं. कसे पैसे मिळवले ते सांगावं", अशी टीका राणेंनी केलील.

मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांच्या आदिश बंगल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या या कारवाईवर राणेंनी प्रतिक्रिया दिली. "आदिश बंगला मी खासगी जागा घेऊन महापालाकेची परवानगी घेऊन बांधला आहे. महापालिकेची ओसी घेतल्यानंतर घरात गेलेलो आहे. मी कोणतीही बेकायदेशीर गोष्ट केलेली नाही. मात्र हे सुडाचं राजकारण आहे. मी टेरेसवर सगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत. आम्ही बाहेरुन भाज्या आणत नाहीत. ते बेकायदेशीर असू शकतं. माझा लोकशाहीवर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे", असं नारायण राणे म्हणाले.

First published: