Home /News /maharashtra /

चर्चा तर होणारच..! शिवसेना आमदाराच्या मुलाच्या लग्नाला नारायण राणेंची उपस्थिती; ठाकरे कुटुंबात नाराजीचा सूर

चर्चा तर होणारच..! शिवसेना आमदाराच्या मुलाच्या लग्नाला नारायण राणेंची उपस्थिती; ठाकरे कुटुंबात नाराजीचा सूर

शनिवारी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ज्यामुळे ठाकरे कुटुंबीयही नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन (winter session) काळात शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध राणे (Rane) असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र शनिवारी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. यामुळे ठाकरे कुटुंबीयही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शनिवारी शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांच्या मुलाच्या लग्नं सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली होती. नारायण राणेंच्या उपस्थितीमुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि ठाकरे कुटुंबही नारज झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा-  महाराष्ट्रात कधी लागू होणार Lockdown?, राजेश टोपे म्हणाले... नारायण राणे यांनी शिवसेना आमदार मुलाच्या लग्नाला हजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. नितेश राणे यांची दोन वेळा चौकशी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्याने केला होता. त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारी वरून कणकवली पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर रहाण्याचे समन्स बजावलं होतं. हेही वाचा-  जालना हादरलं, अपहरण करून दलित तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस स्टेशन मध्ये दोन वेळा हजेरी लावली लागली. शुक्रवारी नितेश राणे गुपचूपपणे रात्री कणकवली पोलीस स्टेशनला आले होते. त्यानंतर शनिवारीही पुन्हा नितेश राणे यांनी कणकवली पोलिसांनी बोलवून घेतलं आणि चौकशी केल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेशी पंगा घेणं नितेश राणे यांना चांगलंच महागात पडल्याचही राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Narayan rane, Shiv sena

पुढील बातम्या