मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Narayan Rane Arrest: नारायण राणेंच्या अटकेसाठी का निवडलं गोळवली हे ठिकाण? वाचा Inside Story

Narayan Rane Arrest: नारायण राणेंच्या अटकेसाठी का निवडलं गोळवली हे ठिकाण? वाचा Inside Story

Naryan Rane

Naryan Rane

केंद्रीय मंत्री नारायण राणे याना (Narayan Rane Arrested) संगमेश्वरमधील गोळवली याठिकाणी अटक करण्यात आली आहे.

संगमेश्वर, 24 ऑगस्ट:  केंद्रीय मंत्री नारायण राणे याना (Narayan Rane Arrested) संगमेश्वरमधील गोळवली याठिकाणी अटक करण्यात आली आहे. जनआशीर्वाद यात्रे दरम्यान (BJP Jan Ashirwad Yatra) महाड येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ही टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर नारायण राणेंच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायलयाने फेटाळला आणि अखेर राणेंना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.

यावेळी नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे पोलिसांच्या ताफ्यासह रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल होती. पोलिसांचा बंदोबस्त देखील संगमेश्वरमध्ये वाढवण्यात आला होता. गोळवलीतील ज्या विकासप्रकल्पाच्या ठिकाणी नारायण राणे उपस्थित होते, तो परिसर मुख्य रस्त्यापासून एका किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. या गोळवलकर गुरुजी स्मृती विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी नारायण राणे याठिकाणी उपस्थित होते. हा परिसर मुख्य रस्त्यापासून बराच आत असल्यामुळे पोलिसांनी राणेंचा अटकेसाठी ही जागा निवडल्याचे म्हटलं जात आहे.

हे वाचा-नारायण राणे प्रकरणावर NCP अध्यक्ष शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

ज्याठिकाणी राणे उपस्थित होते तो विकास प्रकल्प मुख्य रस्त्यापासून साधारण 1 किलोमीटर आत आहे. शिवाय याठिकाणी एका वेळी एकच गाडी जाण्यासाठी जागा आहे. त्यामुळेच की काय पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेसाठी ही जागा निवडल्याचं म्हटलं जात आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होणार नाहीत आणि गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. तसंच एकावेळी एकच गाडी आत येणं शक्य असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे पोलिसांनी ही संधी साधत नारायण राणेंच्या अटकेची कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.

हे वाचा-मोठी बातमी: नारायण राणे यांची तब्येत बिघडली, वैद्यकीय तपासणी सुरु

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यावर भाजप नेते प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, नारायण राणेंनी काढलेली जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच नारायण राणेंची सुटका होत नाही तोवर भाजप आंदोलन करत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Narayan rane