मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

ब्रेकिंग ! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

  • Published by:  Sunil Desale
संगमेश्वर, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. (Union Minister Narayan Rane arrested) रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांकडे नारायण राणे यांचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणेंना घेऊन पोलिसांचं पथक रत्नागिरीकडे रवाना झालं आहे. "त्या वक्तव्याच्या पाठीशी भाजप नाही, पण..." - देवेंद्र फडणवीस रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील. काय म्हटले होते नारायण राणे? जनआशीर्वाद यात्रे दरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्याचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे. शिवसेनेत ते फक्त नावापुरते मंत्री राहिले आहेत. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना मातोश्रीला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे.
First published:

पुढील बातम्या