मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'म्याव म्याव' प्रकरणावर प्रश्न विचारताच नारायण राणे संतप्त, म्हणाले...

'म्याव म्याव' प्रकरणावर प्रश्न विचारताच नारायण राणे संतप्त, म्हणाले...

Union Minister Narayan Rane press conference: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Union Minister Narayan Rane press conference: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Union Minister Narayan Rane press conference: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्ग, 28 डिसेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना काढलेल्या मांजरीच्या आवाजावर प्रश्न विचारला असता नारायण राणे संतप्त झाल्याचं पहायला मिळालं. सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणी मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितेश राणेंची तीनवेळा चौकशी करण्यात आली आहे. त्यावरुनही नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणाही साधल्याचं पहायला मिळालं.

पोलिसांची वागणूक कुठल्या प्रकारची ?

नारायण राणे म्हणाले, पोलिसांची वागणूक कुठल्या प्रकारची आहे? काय घडलं इतकं मोठं? ठिक आहे मी पण मंत्री आहे केंद्रात. आम्हाला काहीही फरक पडत नाही. हे सरकार तीन पक्षाचं आहे की चार पक्षाचं... मी दखल घेत नाही. मुख्यमंत्री आहेत की नाही मला माहिती नाही.

हे कसलं सरकार ? 

नारायण राणे पुढे म्हणाले, परवा अर्थमंत्री आले. येताना पैसे जाहीर केले ते पोहोचले का? याची माहीती घेऊन यायला पाहिजे होतं. लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी 13 कोटीची प्रोव्हिजन आहे आणि साडेसहा हजार कोटी पाठवले आता तीन महिने राहिले आहेत. एकही टेंडर नाही. अनेक गोष्टी आहेत. पूर परिस्थिती आहे वादळ आहे. सी वर्ल्ड बंद करतात. हे कसलं सरकार. मी नाही मानत सरकार.

वाचा : शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ

विधिमंडळात सर्वात चांगले काम नितेश राणेंचं

मीडिया असो किंवा पोलीस असो माझी मर्यादा आहे. कायद्याने वागायचं एवढं मला कळतं. माझ्या पदाचा मी कधी दुरुपयोग केला नाही. इतकी वर्षे मी लोकप्रतिनिदी आहे. मला वाटतं तुम्हाला जे काही वाटतं त्याची माहिती घ्या आणि दाखवायचं आहे ते दाखवा. माझा मुलगा विधिमंडळात सर्वात चांगले काम करत आहे आणि तेच त्यांना पोटदुखी आहे असंही नारायण राणे म्हणाले.

वाचा : शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा

नारायण राणे संतप्त

नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना मांजराचा आवाज काढला. यावर विचारले असता नारायण राणे संतप्त झाले आणि म्हणाले, विधिमंडळात कुठे केलं? पायरीवर बोलायला काही बंधने आहेत का? असंसदीय शब्द आहेत का? कोण अजित पवार मी ओळखत नाही अजित पवारला. या राज्यातील लोकांच्या कोट्यवधी रुपयांचा आरोप आहे त्यांचा रेफरन्स काय देता तुम्ही?

एका आमदारासाठी तुम्ही एवढी मोठी यंत्रणा लावताय? एवढा मोठा पोलीस फौजफाटा कशासाठी? मांजरीचा आवाज काढल्यास एवढा राग का यावा? आदित्य ठाकरे आणि मांजराचा काही संबंध आहे का? मला म्हणायचंय त्यांचा आवाज तसा नाहीये. पण मांजरीचा आवाज काढल्याने राग का यावा? असे सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केले.

नितेश राणे कुठे आहेत?

पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितेश राणे कुठे आहेत? तेव्हा नारायण राणे यांनी संतप्त होत म्हटलं, कुठे आहेत हे सांगायला मला काय तुम्ही मुर्ख माणूस समजलात का? कुठे आहेत हे जरी मला माहिती असेल तरी मी सांगणार नाही. तुम्हाला का सांगावं? असा सवालही नारायण राणेंनी केला.

First published:
top videos

    Tags: Narayan rane, Nitesh rane