मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तेव्हा उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना फोन केला', नारायण राणेंचा प्रहार

'...तेव्हा उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना फोन केला', नारायण राणेंचा प्रहार

उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'सत्तेचं दूध पाजलं म्हणता, पण ते तूप कोणी खाल्ले? मेवा आणि तूप मातोश्रीने खाल्ले. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यामुळे ते देशात कुठेही जावू शकतात, त्यांना हा दौरा झोंबला आहे,' अशी टोकाची टीका नारायण राणे यांनी केली. 'ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले. पूर्वी आमदार आणि खासदारांच्या बैठका घेत होते. उद्धव ठाकरेंचं भाषण निराशेच्या भावनेतून केलेलं भाषण होतं. आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात किती गटप्रमुखांना भेटले. अडीच वर्षात मंत्रालयात तीन तास बसले. अडीच वर्षात काय केलं?' असा सवाल नारायण राणेंनी विचारला आहे. 'शिवाजी महाराजांचं नाव सांगून सत्तेवर आलात. उद्धव ठाकरे स्वार्थी आहेत. मला भाजपमध्ये घेऊ नये म्हणून अमित शाह यांना फोन करत होते. मोदींच्या नावे खासदार निवडून आणले, उद्धव ठाकरेंमुळे पाच आमदार निवडून येणार नाहीत. महाराष्ट्राच्या सत्तेवर गद्दारी करून आलात, खोके घेण्यासाठी आलात,' असा पलटवार नारायण राणेंनी केला. 'मुंबईतील नागरिकांचं शोषण केलं, टक्केवारीसाठी कलानगरला ऑफिस उघडलं. मुंबईला बकाल गेलं. बेस्ट डबघाईला आणली. मुंबईवर संकटं येतात तेव्हा मोदी मदत करतात,' असं नारायण राणे म्हणाले.
First published:

Tags: Narayan rane, Uddhav thackeray

पुढील बातम्या