अशोक चव्हाण मोहनप्रकाश यांनी माझ्याविरूद्ध षडयंत्र रचलं - राणेंचा आरोप

अशोक चव्हाण मोहनप्रकाश यांनी माझ्याविरूद्ध षडयंत्र रचलं - राणेंचा आरोप

नारायण राणे उद्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यानिमित्तानं राणे मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं सांगण्यात येतंय

  • Share this:

सिंधुदुर्ग,17 सप्टेंबर: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कमिटी बरखास्त केल्यानंतर नारायण राणेंनी आता थेट काँग्रेसलाच शिंगावर घेतलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय.

नारायण राणे उद्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यानिमित्तानं राणे मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं सांगण्यात येतंय. या षडयंत्राबाबत बोलताना सुरुवात जरी त्यांनी केली असली तरी शेवट आपण करणार असं नारायण राणेंनी म्हटलंय. तसंच नवरात्रोत्सवात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेतही नारायण राणेंनी दिले आहेत.

First published: September 17, 2017, 8:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading