• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अनाथ संवर्गातील आरक्षणाचा पहिला लाभार्थी नारायण इंगळे; MPSC तून झाली या पदावर नियुक्ती

अनाथ संवर्गातील आरक्षणाचा पहिला लाभार्थी नारायण इंगळे; MPSC तून झाली या पदावर नियुक्ती

नारायण इंगळे या परीक्षार्थीची अनाथ संवर्गातील (orphan reservation) आरक्षणातून निवड झाली आहे. अनाथ संवर्गातील आरक्षणातून अधिकारी झालेला नारायण इंगळे हा पहिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 01 ऑक्टोंबर : अनाथ संवर्गातील आरक्षणातून नारायण इंगळे (Narayan Ingle) या तरुणाला प्रादेशिक वनाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. त्यातून नारायण इंगळे या परीक्षार्थीची अनाथ संवर्गातील (orphan reservation) आरक्षणातून निवड झाली आहे. अनाथ संवर्गातील आरक्षणातून अधिकारी झालेला नारायण इंगळे हा पहिला आहे. त्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 13 ते 15 जुलै, 2019 या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2019 घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यामुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला होता. मात्र, अखेर 28 सप्टेंबरला शासन निर्णयानंतर हा निकाल लावण्यात आला. हे वाचा - मद्यधुंद बॉयफ्रेंडसोबत Sex करणं महिलेच्या जीवावर, गळा दाबून केली हत्या अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण देण्यात यावे, यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता. या आरक्षणाद्वारे नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वनाधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महिला व बालविकास मंत्री ॲङ ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायणला दिली. हे वाचा - “Cyclone Gulab मुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ” राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यावर मनसेचा निशाणा अनाथ मुलांनाही यापुढे आरक्षणाद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास ॲङ.ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. तर नारायण इंगळे यांनी अनाथ आरक्षण संवर्गातून नियुक्ती मिळाल्याबद्दल महिला व बालविकास विभाग आणि मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आभार मानले.
  Published by:News18 Desk
  First published: