मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नांगरणी स्पर्धेचा उत्साह अन् कॉमेंट्रीही; बैलाने मागच्या मागे तरुणाच्या श्रीमुखात झाडल्या दोन लाथा

Video : नांगरणी स्पर्धेचा उत्साह अन् कॉमेंट्रीही; बैलाने मागच्या मागे तरुणाच्या श्रीमुखात झाडल्या दोन लाथा

बैलाने अचानक केलेल्या हल्ल्यात नांगर धरणारा तो युवक जागेवर कोसळला. बैलाच्या लाथेचा हा व्हिडिओ पाहिलात तर त्या तरुणाच्या डोळ्यासमोर चंद्र तारे आले असणार, एवढं नक्की आहे.

  • Published by:  News18 Desk
स्वप्नील घाग, प्रतिनिधी रत्नागिरी, 18 जुलै : मागील तीन वर्षें बंद असलेला नांगरणी स्पर्धेचा ट्रेंड आता पुन्हा सुरू झाला आहे. काल चिपळूणमधील निवळी गावात अशीच नांगरणी स्पर्धा पार पडली. यावेळी एका बैलाने नांगर धरणाऱ्या युवकाच्या श्रीमुखात दोन्ही लाथ झाडल्याचे पाहायला मिळाले. अन् तरुण जागेवरच कोसळला -  बैलाने अचानक केलेल्या हल्ल्यात नांगर धरणारा तो युवक जागेवर कोसळला. बैलाच्या लाथेचा हा व्हिडिओ पाहिलात तर त्या तरुणाच्या डोळ्यासमोर चंद्र तारे आले असणार, एवढं नक्की आहे. मात्र, विनोदाचा भाग सोडला तर बैलाची लाथ अन्य कुठे बसली असती तर त्याचे काय झाले असते, याचा विचार न केलेलाच बरा आहे. अर्थात बैलाने लाथा मारल्यानंतर तो तरुण जागेवर कोसळला. हेही वाचा - महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, विदर्भासह अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती; वाचा, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती नांगरणी स्पर्धेचा ट्रेंड सुरू, मात्र, गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण? यानंतर त्याला पाणी देऊन आवश्यक उपचार करण्यात आले. मात्र, याहून अधिक गंभीर घटना झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने पुन्हा निर्माण झाला आहे. अशा स्पर्धांना ग्रामीण भागातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अनेक राजकीय लोक या स्पर्धांमधून राजकीय नांगरणी करतात. मात्र, कोणी जीवाशी गेलं तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
First published:

Tags: Ratnagiri

पुढील बातम्या