Nandurbar ZP Election Result: आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नीचा पराभव

Nandurbar ZP Election Result: आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नीचा पराभव

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे.

  • Share this:

निलेश पवार,(प्रतिनिधी)

नंदुरबार,8 जानेवारी: राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे.

नंदूरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूत लढणाऱ्या आदिवासी विकालमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेश पराडके यांनी विजयश्री खेचून आणली आहे. धडगाव तालुक्यात काँग्रेसचे चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विडयी झाले. दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या एकूण 56 पैकी 21 जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यात काँग्रेस आघाडीवर आहे.

नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. 2013 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला, मात्र 2008 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला नंदुरबार जिल्हा परिषद खेचून आणण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे.

2013 मधील नंदुरबार जिल्हा परिषदेचं संख्याबळ – 56

काँग्रेस – 29

राष्ट्रवादी – 25

अपक्ष – 01

भाजप – 01

शिवसेना– 00

जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी के सी पाडवी यांच्याकडे होती. त्यांची पत्नीच निवडणूक रिंगणात असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. के सी पाडवी हे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये के सी पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात के सी पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच के. सी. पाडवी यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: January 8, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading