मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! 11 गरोदर माता घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा भीषण अपघात

धक्कादायक! 11 गरोदर माता घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा भीषण अपघात

गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा शहादामध्ये भीषण अपघात झाला आहे. लोणखेडा कॉलेज गेटसमोर ही ऍम्ब्युलन्स पलटी झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nandurbar, India

नंदुरबार, 1 फेब्रुवारी : गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा शहादामध्ये भीषण अपघात झाला आहे. लोणखेडा कॉलेज गेटसमोर ही ऍम्ब्युलन्स पलटी झाली आहे. अपघातावेळी 11 गरोदर माता ऍम्ब्युलन्समध्ये होत्या. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शहादामधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातले हे रुग्ण होते.

ऍम्ब्युलन्स पलटी झाल्यानंतर तिकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी ऍम्ब्युलन्समधून रुग्ण आणि गरोदर मातांना बाहेर काढलं. या ऍम्ब्युलन्सचा अपघात ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे झाला का अतिवेगामुळे झाला याचा तपास सुरू आहे.

First published: