मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nandurbar rain update : पूर आला अन् स्मशानभूमीसह प्रेतंही गेली वाहून, ठेकेदाराच्या चुकीने गावकऱ्यांना नाहक त्रास

Nandurbar rain update : पूर आला अन् स्मशानभूमीसह प्रेतंही गेली वाहून, ठेकेदाराच्या चुकीने गावकऱ्यांना नाहक त्रास

उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. (Nandurbar rain update)

उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. (Nandurbar rain update)

उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. (Nandurbar rain update)

    नंदुरबार, 18 ऑगस्ट : मागच्या चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. (Nandurbar rain update) पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान नवापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. पावसामुळे वाघसेपा गावातील नदीकिनारी असलेली स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. 

    दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे उत्तर कार्य बाकी असताना प्रेत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. स्मशानभूमी वाहून नुकसान झाल्याच्या सगळ्या प्रकाराला साठवण बंधारा बांधणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे झाले असल्याचा आरोप वाघसेपा येथील गावकऱ्यांनी केला आहे.

    हे ही वाचा : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, शस्त्र सापडल्याची माहिती

    साठवण बंधारा बांधत असतानाच गावकऱ्यांनी सदर ठेकेदाराला बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलावी, तसेच स्मशानभूमीच्या बाजूने भराव टाकून संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी केली होती. परंतु सदर ठेकेदाराने माती टाकून थातूरमातूर काम केल्याने वाघसेपा ग्रामस्थांची वडिलोपार्जित स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून अस्तित्व नष्ट झाल्याने सदर ठेकेदारावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

    जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन वाघसेपा गावातील स्मशानभूमीत पुरामुळे नदीचे स्वरूप आल्याच्या ठिकाणी तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे. अशी मागणी वाघसेपा गावाचे रोजगार सेवक विजय पाडवी, पोलीस पाटील विश्वास पाडवी, अविनाश गावित, दारासिंग पाडवी, कृष्णाजी पाडवी, जितेश पाडवी, दीपक पाडवी आदी ग्रामस्थांनी नदीकिनारी नुकसान झालेल्या स्मशानभूमीची पाहणी करून तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

    हे ही वाचा : Maharashtra Flood Damage : राज्यात पूरपरिस्थीती गंभीर तब्बल 20 हजार नागरिकांचे स्थलांतर, 122 नागरिक दगावले

    राज्यात पावसाने थैमान 122 जणांचा मृत्यू

    राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यातील 350 गावांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maharashtra Flood Damage) गडचिरोली, भंडारा, वर्धा जिल्ह्यात याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी राज्यात 117 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तर 20 हजार 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    राज्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 122 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर 243 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 3 हजार 534 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यासाठी राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Nashik, Rain fall, Rain flood, Weather

    पुढील बातम्या