मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : मुलं चोरण्याच्या संशयावरून पंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकाऱ्यांना बेदम मारहाण

VIDEO : मुलं चोरण्याच्या संशयावरून पंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकाऱ्यांना बेदम मारहाण

मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन तीघांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांची गाडी पेटवुन दिल्याची भयावह घटना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात घडली आहे.

मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन तीघांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांची गाडी पेटवुन दिल्याची भयावह घटना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात घडली आहे.

मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन तीघांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांची गाडी पेटवुन दिल्याची भयावह घटना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात घडली आहे.

  नंदुरबार, 29 जून : मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन तिघांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांची गाडी पेटवुन दिल्याची भयावह घटना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात घडली आहे. संशयीत हे पंढरपूरमधील माजी नगरसेवकांसह त्यांचे सहकारी असून मजुर शोधण्यासाठी या भागात आले होते.

  मात्र संतप्त जमावाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची शहानिशा न करता म्हसावद पोलीस ठाण्यात घुडदुस घातला. त्यांच्या इनोव्हा गाडीची तोडफोड करत गाडी जाळून टाकली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या.

  या सगळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील अतिरीक्त कुमक म्हसावद येथे तैणात करण्यात आली आहे. संपूर्ण भागात सध्या तणावपुर्ण शांतात आहे. पंढरपुरचे माजी नगरसेवक नंदकुमार ढोबे आपल्या दोन साथीदारांसह मजुर शोधात नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद गावाजवळ आले होते. मजुरांची चौकशी करत असतांनाच मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय येत काही जणांनी त्यांच्या सह त्यांच्या साथीदारांना बेदम  मारहाण केली.

  त्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनातून म्हसावद पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर संतप्त जमावाने म्हसावद पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला. या संशयीतांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत त्यांची इनो्व्हा गाडीची मोडतोड करत तिला आग लावुन दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठी चार्ज करत आठ ते दहा अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या .

  दरम्यान, जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवांचा पेव सुटला असुन यातूनच अशा घटना समोर येत आहे.

   

  हेही वाचा....

  घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

   VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

   Ghatkopar Plane Crash : तो अर्धा तास..,विमान दुर्घटनेचा घटनाक्रम

   Ghatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी

   काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव

   चार्टर्ड विमानाच्या अपघातानंतर नक्की काय घडलं?

   कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?

  First published:

  Tags: Children, Latest, Marhan nagarsevak, Nandurbar, Robbery, अफवा, नंदूरबार, नगरसेवक, मारहाण