Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बसण्यासाठी जागाच नाही, भाजप नगरसेवकांनी घातला गोंधळ

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बसण्यासाठी जागाच नाही, भाजप नगरसेवकांनी घातला गोंधळ

भाजप नगरसेवकांना सभागृहात बसण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे.

    निलेश पवार, नंदुरबार, 8 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव लोकार्पण सोहळा आणि नगरपालिका नवीन इमारतीच्या ई-भूमी पूजन सोहळ्याआधी भाजप नगरसेवकांना सभागृहात बसण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. सभागृहात आमंत्रित असूनही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बसण्यासाठी जागाच नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी नगरसेवकांनी विनवण्या करूनही भाजप नगरसेवकांनी गोंधळ वाढल्याने शेवटी गोंधळ करणाऱ्या नगरसेवकांना पोलिसांनी सभागृह बाहेर काढलं. मुख्यमंत्री यांच्या महत्वाच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठीच भाजपचे नगरसेवक आले होते, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ई-भूमी पूजन सोहळ्यात काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, मंजुळाताई गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या