नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांना फक्त 15 रुपयात मिळणार जेवण!

नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांना फक्त 15 रुपयात मिळणार जेवण!

नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी अतिशय अल्पदरात एक भोजनालय सुरू केलंय.

  • Share this:

निलेश पवार, नंदुरबार, 6 ऑक्टोबर - नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी अतिशय अल्पदरात एक भोजनालय सुरू केलंय. या योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा रुपयात पोटभर जेवण उपलब्ध करुन देणार आहे.

नंदूरबारची बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत उभं राहावं लागतं. पण बाजार समितीनं शेतकऱ्यांची भूक भागविण्यासाठी त्यांच्या उत्तम आणि किफायतीशीर जेवणाची व्यवस्था केलीय. या जेवणात तीन पोळ्या, भाजी, ठेचा, वरण, भात असा मेनू देण्यात येतोय. यासाठी केवळ 15 रुपये आकारले जात असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेटट्टी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या दोघांनी स्वत: पैसे देवून जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाच्या दर्जाबाबतही समाधान व्यक्त केलं.

बाजार समितीला या स्तुत्य योजनेचा काही भार सोसावा लागणार आहे. पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानापुढं ही बाब छोटीशी असल्याचं बाजार समिती पदाधिकाऱ्यांचं म्हणनं आहे. जगाच्या पोशिंदाल्या पोटभर खाऊ घालण्याचं समाधान मिळवण्यात नंदूरबार बाजार समितीला यश आलंय.

 सव्वा महिनानंतर ८०० फूट खोल दरीतून बस काढल्यानंतरचे फोटो

First published: October 6, 2018, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading