10 एप्रिल : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज विरोधात हजारो संतप्त शेतकऱ्यांनी शहादा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. सुमारे 4 ते 5 हजार शेतकरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. या सर्व शेतकऱ्यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. रात्री उशिरा हे शेतकरी तिथून निघून गेले.
लाठीचार्जचे आदेश नसतांना शेतकऱ्यांना जनावराप्रमाणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते त्याना गुंडाप्रमाणे वागणुक देत पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केलाय.
दरम्यान, मनमानी पध्दतीनं गुन्हे दाखल करून घेत शेतकऱ्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी शेतरकऱ्यांनी केलाय. स्वाभीमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज शहाद्यात येत असल्यानं तालुक्यात वातावरण अधिकच तापलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer's protest, Nandurbar