सलाम दातृत्वाला...मजुराच्या अवयवदानामुळे वाचला चौघांचा जीव!

सलाम दातृत्वाला...मजुराच्या अवयवदानामुळे वाचला चौघांचा जीव!

माणूस गेल्यानंतर त्याचा उपयोग दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी होऊ शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती जनजागृती करण्याची.

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड, 5, डिसेंबर : पैशाचं, अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र नांदेड जिल्ह्यातल्या एका मजुराच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं.

लोहा तालुक्यातील माळकोळी इथला 30 वर्षांचा भुजंग मस्के हा रंगकाम करण्यासाठी सोलापूरला गेला होता .. भासलेगाव येथे मंदिराचे रंगकाम करताना तो पाय घसरून खाली पडला. 26 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला सोलापूर आणि नंतर नांदेडच्या खाजगी रुगणालयात उपाचार सुरू होते .

पण त्याचं ब्रेनडेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे सर्व अवयव चांगले असल्याने डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भुजंगमुळे जर काही लोकांना जीवदान मिळणार असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यातल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं.

नांदेडच्या ग्लोबल रुग्णालयात ही प्रक्रिया पार पडली. मुबई आणि औरंगाबादच्या डॉक्टरानी ऑपरेशन करून त्याचे अवयव काढले. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ असं 6 किलोमीटरचे अंतर अवघ्या 4 मिनिटं 50 सेकंदात पूर्ण करण्यात आलं. विशेष विमानाने भुजंगचं ह्रदय मुंबईला रवाना करण्यात आलं. मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटल मध्ये ह्रदय प्रत्यारोपण केलं जाणार आहे.

तर औरंगाबाद इथल्या एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि एक किडनी प्रत्यारोपण केलं जाणार आहे. तर नांदेड मध्ये एका किडनीचं प्रत्यारोपण होणार आहे. नांदेड मध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपण केलं जाणार आहे. ब्रेनडेड झालेल्या भुजंगच्या घरची परिस्थिती हलाखिची आहे. त्याचे वडील आणि एक भाऊ मजुरी करतात.

त्याच्या पत्नीने धैर्य दाखवत पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजापुढं नवा आदर्श निर्माण केलाय. आता त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढं यावं असं आवाहन भुजंगच्या मित्रांनी केलं आहे.

अवयव दानाची समाजाला आज अतिशय गरज आहे. अवयव मिळावे यासाठीची प्रतिक्षा यादी मोठी असून दाते कमी आहेत. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर कही वेळात जर अवयव दान केले गेले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. माणूस गेल्यानंतर त्याचा उपयोग दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी होऊ शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती जनजागृती करण्याची.

VIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला

First Published: Dec 6, 2018 06:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading