अशोक चव्हाणांचा गड अभेद्यच,भाजपची चढाई सपशेल अपयशी

अशोक चव्हाणांचा गड अभेद्यच,भाजपची चढाई सपशेल अपयशी

नांदेड म्हणजे अशोक चव्हाण...हे समिकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नांदेड-वाघाळा महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकलाय.

  • Share this:

12 आॅक्टोबर : नांदेड म्हणजे अशोक चव्हाण...हे समिकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नांदेड-वाघाळा महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकलाय. काँग्रेसने घसघशीत बहुमत मिळवत एकहाती सत्ता राखलीये. भाजपने सत्ता मिळवण्याची पूर्ण ताकद पणाला लावली पण चव्हाणांच्या गडाची वीट सुद्धा भाजपला हलवता आली नाही. तर एमएआयएमने केलेला शिरकाव यावेळी मुस्लिम मतदारांनीच हाणून पाडत काँग्रेसला साथ दिलीये.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीची ८१ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आणि ही आघाडी आता विजयात बदलली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 42 जागांचा आकडा काँग्रेसने पार केलाय. आतापर्यंत 32 जागांचा विजयी निकाल हाती आलाय त्यानुसार 30 जागांवर काँग्रेस विजयी झालंय तर भाजप आणि सेनेच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा आलीये.

एमआयएमचा धुव्वा

दुसरीकडे मागील निवडणुकीत हैदराबादमधून नांदेडमध्ये शिरकाव केलेल्या एमआयएमचा पार धुव्वा उडाला. मागील निवडणुकीत एमआयएमला 11 जागा मिळाल्या होत्या. नांदेडमध्ये या विजयामुळे राज्याच्या राजकारणात एमएआयएमची चर्चेनं जोर धरला होता. पण, आज मतदारराजांनी ज्या प्रकारे एमआयएमला संधी दिली होती तसाच 'हात'ही दाखवलाय. एमएआयएमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

राष्ट्रवादी शुन्यावर आऊट

तर हीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झालीये. एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत पुरता धुव्वा उडालाय. राष्ट्रवादीलाही भोपळा फोडता आला नाही.

भाजपच्या स्वप्नावर पाणी

विशेष म्हणजे नांदेड महापालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने अशोक चव्हाण विरुद्ध भाजप अशीच होती. भाजपने मागील निवडणुकीत 2 जागा जिंकल्या होत्या. पण नगरपरिषदा, ग्रामपंचायत निवडणुकी विजयानंतर भाजपला नांदेडमध्ये मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्ण ताकद पणाला लावली होती.  पण नांदेडकरांनी घरच्या माणसाला साथ देत भाजपच्या आशा-अपेक्षेवर पाणी फेरलंय. त्यामुळे अशोक चव्हाणांनी आपला गड कायम राखला असून आयबीएन लोकमतशी बोलताना नांदेडकरांचे आभार मानले आहे.

First published: October 12, 2017, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading