Elec-widget

महाराष्ट्राचा महासंग्राम : नांदेड दक्षिणमध्ये भाजप-सेनेत चढाओढ, वंचित फॅक्टर महत्वाचा

महाराष्ट्राचा महासंग्राम : नांदेड दक्षिणमध्ये भाजप-सेनेत चढाओढ, वंचित फॅक्टर महत्वाचा

लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधून निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. त्यामुळे नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या शिवसेनेच्या उमेदवार असतील, असा कयास आहे.

  • Share this:

नांदेड,21 सप्टेंबर :

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधून निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. त्यामुळे नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या शिवसेनेच्या उमेदवार असतील, असा कयास आहे.

नांदेड दक्षिण हा मतदारसंघ म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको-हडको आणि सोनखेडचा काही भाग मिळून बनलेला आहे. या मतदारसंघात मुस्लिम, मराठा आणि दलित मतदार निर्णायक संख्येने आहेत. त्यामुळे वंचित आघाडीकडून लढण्यासाठी इथं अनेकजण उत्सुक आहेत.

2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे इथून भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपकडून संतुक हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, प्रणिता देवरे आदी नाव चर्चेत आहेत. या मतदारसंघात कायमच सर्वाधिक उमेदवार असतात, त्यामुळे इथली लढाई रंजक असते.

महाराष्ट्राचा महासंग्राम : उरणमध्ये शिवसेनेसमोर जागा टिकवण्याचं आव्हान

Loading...

नांदेड महापालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे पण नांदेडचे अंतर्गत रस्ते एखाद्या खेड्यातल्या रस्त्यांना लाजवतील असेच आहेत. अपुऱ्या पावसामुळे शहरात पाणी टंचाई आहे. त्याला सर्वस्वी मनपा जवाबदार आहे. पण त्याचा रोष आमदार- खासदारावर जातोय. उद्योगधंद्याच्या बाबतीत नांदेड कपाळकरंटेच आहे. एकेकाळी नांदेडचं वैभव असणारी टेक्सटाईल मिल अद्याप बंदच आहे. इतरही छोटे मोठे उद्योग बंद पडलेले आहेत. हे सगळे मुद्दे या निवडणुकीत गाजणार आहेत.

विधानसभा निवडणूक निकाल 2019

हेमंत पाटील, शिवसेना - 45 हजार 836

दिलीप कुंदकुर्ते,भाजप - ४२ हजार 629

===============================================================================

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...