पती शहीद झाल्यानंतर वीरपत्नी जे बोलली ते ऐकून तुमचाही संताप अनावर होईल...

पती शहीद झाल्यानंतर वीरपत्नी जे बोलली ते ऐकून तुमचाही संताप अनावर होईल...

शहीद जवान संभाजी कदम यांच्या पत्नीने आपला संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड, 29 जानेवारी : पती शहीद झाल्यानंतर मुलीला शाळेत प्रवेश घेताना आलेल्या अडचणींमुळे वीरपत्नीच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. 'माझे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं,' अशा शब्दांत शहीद जवान संभाजी कदम यांच्या पत्नीने आपला संताप व्यक्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम यांचे पती संभाजी कदम हे काश्मीरमधील नागरौता येथे 29 नोव्हेंबर 2016 रोजी शहीद झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर वीरपत्नी खंबीरपणे उभी राहिली आणि तिने आपल्या मुलीला चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र आपल्या असंवेदनशील व्यवस्थेनी शीतल कदम यांची निराशा केली आणि त्यातूनच मग कदम यांच्या भावना तीव्र शब्दांत समाजासमोर आल्या आहेत.

'जिथे आम्ही गेलो तिथं साधी आमची विचारपूसही केली जात नव्हती. अनेक पत्र घेऊन गेले तरीही प्रतिसाद मिळाला नाही. या पत्रांचा काहीही फरक पडत नाही अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली,' असं शीतल कदम यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था किती निगरगट्ट असू शकते, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

बीडमध्ये लाचखोर तहसीलदाराचा पर्दाफाश, सापळा रचून पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

शहीद संभाजी कदम यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी आणि आता 6 वर्षांची एकुलती एक मुलगी आहे. या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला म्हणून शीतल कदम शहरातील ज्ञानमाता इंग्लिश स्कुल मध्ये गेल्या. पण मागील वर्षी या वीरपत्नीला परत पाठवण्यात आले आणि यंदाही तीच गत. अखेर त्यांनी शाळेतील लोकांना आपण वीरपत्नी आहोत माझ्या मुलीला प्रवेश द्या जी काही फी असेल ती भरायला तयार आहे, असेही सांगितले. पण तरीही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं वीरपत्नी कदम यांनी सांगितलं आहे.

मराठी शाळेत शिकल्यानं 102 जणांना नोकरीतून डावललं, इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना प्राधान्य

दरम्यान, या घटनेनंतर विविध सामाजिक संघटनांनी शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या संस्था चालकाला बोलावून तंबी दिली. या शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांदेडकर शाळेसमोर आंदोलन करणार आहेत.

First published: January 29, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या