मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदेंकडे इनकमिंग सुरूच, नांदेडचे पदाधिकारी-शिवसैनिक मुंबईकडे रवाना, उद्या प्रवेश

शिंदेंकडे इनकमिंग सुरूच, नांदेडचे पदाधिकारी-शिवसैनिक मुंबईकडे रवाना, उद्या प्रवेश

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं इनकमिंग सुरूच आहे.

  • Published by:  Shreyas
नांदेड, 15 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं इनकमिंग सुरूच आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले नांदेडचे (Nanded Shivsena) दोन जिल्हाप्रमुख शेकडो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत. यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर प्रवेश होणार आहे. साधारणतः तीनशे शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी मुंबईकडे रवाना झालेत तर काही जण रेल्वेने मुंबईला जात आहेत. एक प्रकारे नांदेडच्या शिंदे गटाचे उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शनच होणार आहे.. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड मध्ये दोन जिल्हाप्रमुख आणि 14 तालुका प्रमुखानी शिंदे गटात प्रवेश केला होता. उद्या दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीचे वेळ दिल्याचं आनंद बोंडारकर आणि उमेश मुंडे या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी सांगितलं आहे. आमदार-खासदारांनंतर पदाधिकारी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यात सत्तांतर होत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आणि अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार गेले. यानंतर शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा देत लोकसभेतला आपला गटनेता आणि प्रतोद बदलला. आमदार-खासदारांनंतर पक्षाचे पदाधिकारीही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिवसेना कुणाची याबद्दल ठाकरे आणि शिंदे यांच्यात निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरू आहे. या लढाईमध्ये आमदार-खासदारांसोबतच हे पदाधिकारीही महत्त्वाचे ठरणार आहेत.
First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या