नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंसमोरच सेना नेत्यांमध्ये बाचाबाची !

नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंसमोरच सेना नेत्यांमध्ये बाचाबाची !

नांदेडचे सेना आमदार हेमंत पाटील आणि सेना नेते विनायक राऊत यांच्यात हा वाद झाला.

  • Share this:

29 जून : नांदेडमध्ये शिवसेनेच्या शेतकरी संवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरच सेना नेत्यांमध्ये वाद झाला. नांदेडचे सेना आमदार हेमंत पाटील आणि सेना नेते विनायक राऊत यांच्यात हा वाद झाला. उद्धव ठाकरे स्टेज येताच माईक कुणाकडे द्यायचा यावरून ही बाचाबाची झाली.

आमदार हेमंत पाटील हे माइकवरुन पक्षप्रमुखांचे स्वागत करत होते. पण त्याचवेळी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आले आणि हेमंत पाटलांना माइक दुसऱ्याकडे देण्याची सूचना केली. पण आमदार हेमंत पाटील काही केल्या माइक सोडण्यास तयार नव्हते, यातूनही दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.

माईक सोडायला सांगणाऱ्या राऊत यांना हेमंत पाटील यांनी व्यासपीठावरच झिडकारुन लावले. या दोन नेत्यांमधील बाचाबाचीच्या निमित्ताने शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाटयावर आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 08:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading