नांदेडमध्ये 7 वीतील विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच केले अत्याचार, नागरिकांमध्ये तीव्र संताप

नांदेडमध्ये 7 वीतील विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच केले अत्याचार, नागरिकांमध्ये तीव्र संताप

शंकरनगरमध्ये इयत्ता 7 वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2 शिक्षकांनी अत्याचार केले.

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड, 20 जानेवारी : शालेय विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच अत्याचार केल्याची खळबळनक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शंकरनगरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत नागरिकांनी आज शंकरनगरमध्ये बंद पाळून रास्तारोकोही केला.

शंकरनगरमध्ये इयत्ता 7 वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2 शिक्षकांनी अत्याचार केले. भाजपा उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अध्यक्ष असलेल्या शाळेत ही घटना घडली आहे. शाळेतील मुलीवर 2 महिन्यापूर्वीच अत्याचार करण्यात आले. त्यानंतर आता मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला.

अत्याचाराची ही घटना समोर आल्यानंतर आरोपी 2 शिक्षकांसह घटनेची माहिती न देणाऱ्या अन्य 3 अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविरोधात गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप परसल्याचं पाहायला मिळालं. आरोपींच्या अटकेसाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केलं आहे. तसंच रास्तारोको करण्याचाही प्रयत्न झाला.

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचं केलं अपहरण, शेतात नेऊन गँगरेप केल्याचा आरोप

दरम्यान, शाळेत शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

First published: January 20, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या