Home /News /maharashtra /

'...तर सत्ताधारी आणि विरोधकांना नग्न करून मारू', मराठा आरक्षणाबाबत आंदोलकाने दिला इशारा

'...तर सत्ताधारी आणि विरोधकांना नग्न करून मारू', मराठा आरक्षणाबाबत आंदोलकाने दिला इशारा

या बैठकीत आगामी काळात मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांनाही इशारा देण्यात आला आहे.

मुजीब शेख, नांदेड, 14 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर मराठा संघटना आता आक्रमक होताना दिसत आहेत. नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेची मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांनाही इशारा देण्यात आला आहे. 'सरकारने सर्वोच्च न्यायालयात पूर्णविचार याचिका दाखल करून तात्काळ मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा.. अन्यथा उग्र आंदोलन करू. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार नाही, पण सत्ताधारी आणि विरोधकाना नग्न करून मारू,' असा आक्रमक इशारा असा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष नाना  साहेब जावळे पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबद्दल देखील बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला. राज्यभरात मराठा संघटना आक्रमक, पंढरपुरातही जाहीर केली भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाचा केंद्र आणि राज्य सरकारकडून चेंडू बनवला असल्याची भावना मराठा समाजात आहे. 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंद ठेवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कोरोना काळात सर्व नियम पाळत हे आंदोलन होईल. मराठा समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात याबाबत जनजागृती सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा चेंडू सुरू असल्याची भावना आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात 21 सप्टेंबरला बंदचा इशारा दिला आहे. कोरोना काळातील सर्व नियम पाळत अत्यावश्यक सेवाना अडथळा न करता हे आंदोलन होईल. मराठा समाजातील अनेक कुटुंब आहेत ज्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाची आवश्यकता आहे. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले त्यामुळे अनेक  मराठा विद्यार्थी आणि तरूणांना या आरक्षणाचा फायदा झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती दिली. यामुळे समाजात आता संतापाची भावना आहे, असं मत क्रांती मोर्चाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Maratha reservation

पुढील बातम्या