• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • डोक्यात गोळी झाडून हत्या; के बी गँगच्या सात जणांना अटक

डोक्यात गोळी झाडून हत्या; के बी गँगच्या सात जणांना अटक

केबी गँगचा नितीन बिगाणिया, लक्ष्मण मोरे, दिगंबर काकडे, मयुरेश कत्ते, सोमेश कत्ते, कृष्णा परदेशी, मुंजाजी घोंडगे यांना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:
नांदेड, 28 जुलै: नांदेडमध्ये (Nanded) गँगवॉरमधून मागील एका वर्षात तीन हत्या (3 murders in year) झाल्या आहेत. गेल्या 20 जुलै रोजी डी गॅंगचा सदस्य विक्रम उर्फ विक्की ठाकूर याची गोळ्या झाडून हत्या (Goon Vicky Thakur murder) करण्यात आली होती. नांदेड शहरातील गाडीपुरा भागात ही घटना घडली होती. तीन  मोटारसायकलवर आलेल्या सात आरोपींनी विक्की ठाकूर याचा पाठलाग करत त्याच्या डोक्यात गोळी  झाडली नंतर त्याच्यावर तलवारीने वार  करण्यात आले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे. एक वर्षापूर्वी डी गँगचा म्होरक्या विक्की चव्हाण याची देखील अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. केबी गँगचा मुख्य भाई कैलास बिगनियाने विक्की चव्हाणची हत्या केली होती. सध्या कैलाश बिगनिया आणि त्याचे काही साथीदार तुरुंगात आहेत. दरम्यान डी गँग संपवण्याचा चंगच केबी गँगने बांधला आहे. काही दिवसांपूर्वी डी गँगचा मयत विक्की ठाकूर तुरुंगातुन सुटला. आता त्याच्याकडे डी गँगची सूत्र येतील यावरून केबी गँगने विक्की ठाकूरला देखील संपवलं. नांदेडमध्ये गँगवारचा भडका, गुंडाच्या डोक्यात गोळी झाडली, नंतर तलवारीने केले सपासप वार! घटनेच्या सातव्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केबी गँगच्या सात जणांना अटक केली आहे. केबी गँगचे हे गुंड नांदेड मधील एका घरात लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकासह पोलीस निरीक्षक चिखलीकर त्या ठिकाणावर पोहचले. आरोपींकडे शस्त्र असल्याचा अंदाज होता त्यानुसार पोलिसांची तयारी होती. पण आरोपींनी प्रतिकार न करता शरणागती पतकरली. केबी गँगचा नितीन बिगाणिया, लक्ष्मण मोरे, दिगंबर काकडे, मयुरेश कत्ते, सोमेश कत्ते, कृष्णा परदेशी, मुंजाजी घोंडगे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी नितीन बिगानीया याची पत्नी आणि बहिणीला देखील याच खून प्रकरणात अटक झाली. विक्की ठाकूर याची हत्या करून आरोपींनी शस्त्र कुठं लपवली याचा तपास पोलीस करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published: