मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक, एनसीबीने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू, नांदेडमध्ये केली होती कारवाई

धक्कादायक, एनसीबीने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू, नांदेडमध्ये केली होती कारवाई

मागील महिन्यात 22 नोव्हेंबर रोजी एनसीबीच्या मुंबई टीमने नांदेड शहराजवळील बोंढार शिवारात छापा मारला होता.

नांदेड, 10 डिसेंबर : अंमली विरोधी पथकाने (ncb) नांदेडमध्ये (nanded) मोठी कारवाई करत 100 किलो अंमली पदार्थाचा (Nanded hemp Seized  Case) साठा जप्त केला होता. पण, या कारवाईमध्ये अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला. या आरोपीच्या मृत्यूमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

मागील महिन्यात 22 नोव्हेंबर रोजी एनसीबीच्या मुंबई टीमने नांदेड शहराजवळील बोंढार शिवारात छापा मारला होता. यावेळी 100 किलो पोपीस्ट्रॉ आणि दीड किलो अफीमचा साठा मिळून आला होता. या प्रकरणात एनसीबी ने 4 आरोपीना अटक केली होती. चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत नांदेडच्या कारागृहात आहेत.

Cyber Attack | सायबर हल्ल्यांमुळे विमान आणि हेलिकॉप्टर क्रॅश होऊ शकतात का?

त्यापैकी जितेंद्रसिंग भुल्लर नावाच्या आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सोबतच्या कैद्यांनी आवाज दिल्यानंतर जितेंद्रसिंघ हालचाल करत नव्हता. कारागृह अधीक्षकांना माहिती मिळाल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. जितेंद्रसिंघ यांचे कॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

काय होती एनसीबीची कारवाई

मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेडमध्ये गांजा घेऊन जाणारा ट्रक पकडला होता. आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापटणम येथून गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार मुंबई एनसीबीच एक पथक नांदेडमधील सीमावर्ती भागात तळ ठोकून होते. नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून गांजा भरून जाणारा ट्रक राज्यात दाखल झाला. एनसीबीच्या पथकाने तब्बल 22 किलोमिटर पाठलाग करत हा ट्रॅक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 101 किलो गांजा आढळला. गांजा घेऊन हा ट्रक जळगाव येथे जाणार होता. दरम्यान, ट्रक चालक गोकुळ नारायण राजपूत आणि सुनिल यादव महाजन यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं होतं.

मूर्ती लहान पण किर्ती महान! कुत्र्याची तहान भागवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, VIDEO

तर 8 दिवसांनी  डोडा पावडर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारला होता. एनसीबीच्या पथकाने अंमली पदार्थांचा साठा आणि रोख रक्कम जप्त केली होती. एका ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या जवळ हा कारखाना होता. या ठिकाणी अफूच्या फुलापासून डोडा पावडर बनवण्यात येत होते. या ठिकाणी अंदाजे 50 किलो डोडा पावडरचा साठा मिळून आला. 25 लाख रुपये रोखही जप्त करण्यात आले होते. एनसीबीच्या टीमने या ठिकाणाहून एका आरोपीला अटक केली होती.

First published: