Home /News /maharashtra /

नांदेडमधील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

नांदेडमधील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू (Dr. Devanand Jaju suicide) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.

नांदेड, 25 मे : नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू (Dr. Devanand Jaju suicide) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. जाजू यांंनी केलेल्या उपचारांमुळे अनेकांचा प्राण वाचला आहे. त्यांच्या रुग्णसेवेमुळे अनकेजण भारावले आहेत. अशा देवदूताचं अचानक निधन झाल्याने त्यांच्या हितचिंतकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. देवानंद जाजू यांचं निधन झाल्यानंतर शहरात चुकीची माहिती पसरली होती. डॉ. जाजू यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त वाऱ्यासारखं शहरात पसरलं होतं. पण त्यांच्या शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ. देवानंद जाजू हे शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे (Nanded Jaju Hospital) प्रमुख होते. तसेच ते भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वैद्यकीय आघाडीचे प्रमुख होते. डॉ. जाजू हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून नांदेड शहराच्या सिडको भागात वैद्यकीय सेवा देत होते. त्यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर आहेत. पण त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. तर डॉ. जाजू हे नांदेडमध्येच रुग्णसेवा करायचे. या दरम्यान आज दुपारी नांदेड ग्रामीण पोलिसांना डॉ. जाजू यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी डॉ. जाजू यांचं निधन झाल्याचं स्पष्ट झालं. (5 खून, जाळपोळ आणि बरेच गुन्हे, 12 लाखांचं बक्षीस असलेल्या दोन खतरनाक नक्षलवाद्यांचं अखेर आत्मसमर्पण) डॉ. जाजू हे वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Nanded, Suicide

पुढील बातम्या