Home /News /maharashtra /

किडनी खराब झालेल्या अपंग रुग्णासाठी आभाळ फाटलं, अ‍ॅम्बुलन्स न मिळाल्याने आई आणि भावाला घेऊन बैलगाडीतून गाठले रुग्णालय

किडनी खराब झालेल्या अपंग रुग्णासाठी आभाळ फाटलं, अ‍ॅम्बुलन्स न मिळाल्याने आई आणि भावाला घेऊन बैलगाडीतून गाठले रुग्णालय

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात पळसगाव इथं काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

नांदेड, 31 मार्च : सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा ग्रामीण भागातील रूग्णांना चांगलाच फटका बसत आहे. शेकडो रुग्णवाहिका असल्याचा दावा करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या रुग्णवाहिका गेल्या कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात पळसगाव इथं काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्हा मुख्यालयापासून या गावाचे अंतर 90 किमी आहे. या गावातील रोहिदास पोवळे या अपंग तरुणाच्या किडन्या खराब झाल्या आहेत. जगण्यासाठी डायलिसिस करणे आवश्यक आहे. पण तालुक्यात सोय नाही, त्यामुळे जिल्हा मुख्यालयी जाणे भाग होते. शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेबाबत विनंती केली, पण ती अमान्य करण्यात आली. त्यामुळे अपंग असलेल्या रोहिदासने वृद्ध आई आणि भावाला घेऊन तब्बल 13 तासांचा बैलगाडीवरून प्रवास करत नांदेड शहर गाठले. जर गरजू व्यक्तीलाही रुग्णवाहिका मिळणार नसेल तर सरकारचा काय उपयोग? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सोलापूरमधूनही अशीच एक करूण कहाणी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या औषधासाठी घोडेस्वारी करत चक्क 50 किलोमीटरचा प्रवास केला. हे घोडेस्वारी करण्याचं कारण संचारबंदीमुळे सोालापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसंच खासगी वाहतूक ही ठप्प झाली आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांनी पेट्रोल देण्यासही बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हेही वाचा- अजित पवारांच्या मोठ्या निर्णयावर नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले... अशातच सोलापूर जिल्ह्यातील दर्शनाळ गावच्या मीर अजमोद्दीन पठाण यांनी आपल्या पत्नीच्या औषधासाठी चक्क 50 किलोमीटरचा प्रवास केला. यात विशेष बाब अशी की त्यांनी हा प्रवास आपल्या सांभाळलेल्या घोड्यावरून केला. एकीकडे देशात अनेक ठिकाणी लोक पायी प्रवास करताना पाहायला मिळत आहे. तर मीर पठाण यांनी मात्र, आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर चक्क घोड्यावरुन प्रवास करत आपल्या पत्नीविषयी असलेला जिव्हाळा व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता मीर अजमोद्दीन पठाण यांची पत्नी मुमताज यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. मात्र, मुमताज यांची औषधे दर्शनाळ आणि अक्कलकोट शहरात उपलब्ध नसल्याने त्यांना सोलापूर शहर गाठावे लागले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Nanded

पुढील बातम्या