मुजीब शेख, नांदेड,02 एप्रिल : कंधार तालुक्यातील हळदा या गावातील एका साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला. पोटात अडकलेला हा खिळा यशस्वीरित्या बाहेर काढून डॉक्टरानी त्या बालकाला जीवनदान दिले आहे. चिमुकल्यावर कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय डॉक्टरांनी गणेशच्या पोटातून हा खिळा बाहेर काढला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हळदा येथील रहिवासी असलेला गणेश महारुद्र येलमीटवाड हा साडे तीन वर्षाचा बालक गुरुवारी घरातील अंगणात खेळत होता. अंगणात खेळताना त्याने तब्बल अडीच इंचाचा खिळा त्याने गिळला. ही बाब मुलाच्या बाजूला बसलेल्या आईला समजली. हा खिळा शौचावाटे जाण्यासाठी त्या मुलाला केळी खाऊ घालण्यात आले. मात्र त्यानंतर मुलाला उलट्या सुरु झाल्या. मुलाला उलट्या होतं असल्याने आई वडील घाबरले आणि नायगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
फलक लावण्यावरून वाद, पाठीत खुपसलेल्या चाकूसह तरुण पोहोचला रुग्णालयात
पोटविकार तज्ज्ञांनी तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर गणेशच्या पोटातून लोखंडी खिळा बाहेर काढला. खिळा काढण्यासाठी गणेश वर कुठलीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. एण्डोस्कोपीद्वारे हा खिळा गणेशच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे पोटातील खिळा काढतांना डॉक्टरांनी गणेशला कुठलीही जखम होऊ दिली नाही. आता गणेशची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान आपल्या मुलाच्या पोटातील खिळा बाहेर काढण्यात आल्यानंतर मुलाच्या आई वडिलांने सुटकेचा श्वास घेतला.
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या
लहान मुले खेळता खेळता लहान दिसेल ती वस्तू तोंडात टाकत असतात. आपण काय खात आहोत हे त्यांना देखील माहिती नसते. तेव्हा मुलांच्या हाती नाणी, पीन, खिळा किंवा इतर वस्तू हाथी लागणार नाही या बाबत पालकांना लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुले काही गिळले असेल तर घरगुती उपचार करू नये. घरगुती उपचारामुळे पोटातील वस्तू आत जाते. तेव्हा अशा घटना टाळायच्या असतील तर पालकांनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन डॉक्टरानी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nanded