Home /News /maharashtra /

सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन लहानग्या मित्रांचा करूण अंत

सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन लहानग्या मित्रांचा करूण अंत

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन लहान मुलांचा करूण अंत झाला आहे.

नांदेड, 22 फेब्रुवारी : मृत्यू कधी आणि कुठे गाठेल, याचा नेम नसतो. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन लहान मुलांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. मुखेड तालुक्यातील जांब गावाजवळची ही घटना आहे. जांब गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेलाच पुलासाठी मोठा खड्डा खोदला होता दोन्ही बालक शेताकडे जात असताना एकाचा  पाय घसरून तो  खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्याच्या नादात दुसरा देखील खड्यात पडला. त्यात 12 वर्षीय माधव सगर आणि ज्ञानेश्वर पुरगुलवाड याचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हेही वाचा- ‘प्रहार’नेत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, उद्या अकोट बंद ही दोन्ही मुले सलगच्या सुट्ट्यांमुळे आपल्या आजोळच्या जांब या गावात आले होते. या दोघांचीही सुट्टे मजेत चालली होती. मात्र खेळता खेळता ही मुले शेताच्या दिशेने जाण्यासाठी निघाली आणि वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले. चिमुकल्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे जांब गावावर शोककळा पसरली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Nanded, Nanded crime

पुढील बातम्या