नागपूर, 13 जुलै : नाणारप्रश्नी आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं. हा प्रकल्प लादणार नाही, चर्चा करून प्रश्न सोडवून असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण शिवसेनेचा नाणारला विरोध कायम आहे. नाणार म्हणजे कोकणच्या पर्यावरणाचा ऱ्हास आहे, असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. नाणार रद्द करायचं अशी मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केलीये. तर हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.
नाणारचा प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण पूरक असला तरी स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे, नारायण राणेंनी हा प्रकल्प केल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे तसेच स्थानिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र आत्तापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका हा प्रकल्प होणारच अशी होती. त्या दृष्टीने विविध विदेशी सरकारांशी आणि कंपन्यांशीही करारही करण्यात आले होते. विधीमंडळास संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आज पहिल्यांदाच मवाळ भूमिका घेतली असून विरोध कायम राहिला तर नाणार प्रकल्प लादणार नाही अशी भूमिका मांडली आहे.
अनेक पक्षांची नाणार विरोधातली भूमिका पाहता, मुख्यमंत्र्यांनी मवाळ भूमिका घेतली असल्याची चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chief Minister, Devendra Fadanvis, Nanar project, Session, Shivsena, देवेंद्र फडणवीस, नाणार प्रकल्प, मुख्यमंत्री, विधानसभा