Home /News /maharashtra /

अशोक चव्हाणांच्या गडात सेनेनं 'करून दाखवलं',हिमायतनगर नगरपंचायतीवर फडकला भगवा

अशोक चव्हाणांच्या गडात सेनेनं 'करून दाखवलं',हिमायतनगर नगरपंचायतीवर फडकला भगवा

  मुजीब शेख, नांदेड, 24 जुलै :  काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गडात शिवसेनेनं मुसंडी मारत हिमायतनगर नगरपंचायतीवर भगवा फडकवला.  हिमायतनगर नगरपंचायतीत काँग्रेसचे बहुमत असतांना अशोक चव्हाण यांना धक्का देत सेनेने नगरअध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी उघडपणे बंड करून अशोक चव्हाण यांनाच आव्हान दिले होते. एकूण 17 सदस्यापैकी 10 सदस्य काँगेसचे आहेत. तर चार सदस्य असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तीन बंडखोरांना सोबत घेऊन सत्ता काबीज केली. नारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी नांदेड महापालिका निवडणूक जिंकून अशोक चव्हाण यांनी गड कायम राखला होता. पण हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं संख्याबळ नसतानाही सत्ता काबीज करून अशोक चव्हाणांना चांगलाच धक्का दिलाय. विशेष म्हणजे नगरपंचायतीत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य होते. तरीही शिवसेनेनं करून दाखवलंय.  नगरअध्यक्षपदासाठी शिवेसेनेचे कुणाल राठोड तीन मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण 10 मतं तर काँग्रेस उमेदवाराला सात मते मिळाली.

  Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील

  काँग्रेसचे नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या पदासाठी निवडणूक झाली होती. काँग्रेसने पुन्हा अब्दुल अखिल यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचा एक गट नाराज झाला होतो आणि या नाराज गटातील तिघांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. काँगेसचे बंडखोर जावेद गणी यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. पक्षीय बलाबल एकूण - 17 काँग्रेस - 10 शिवसेना - 4 राष्ट्रवादी - 2 अपक्ष - 1
  First published:

  Tags: अशोक चव्हाण, काँग्रेस, नांदेड, राष्ट्रवादी, शिवसेना, हिमायतनगर, हिमायतनगर नगरपंचायत

  पुढील बातम्या