'मेहता आणि खडसेंना वेगळा न्याय का?' - पटोलेंचा भाजपला घरचा आहेर

'मेहता आणि खडसेंना वेगळा न्याय का?' - पटोलेंचा भाजपला घरचा आहेर

एकनाथ खडसेंवर पक्षांतर्गंत अन्यायावरून खा. नाना पटोलेंनी आज पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसेंसाठी वेगळा न्याय का?' असा थेट सवाल त्यांनी पक्षनेतृत्वाला केलाय. खडसेंबाबत ज्येष्ठ नेत्यांनी विचार करण्याची गरज असल्याचंही अपेक्षाही नाना पटोलेंनी व्यक्त केली. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट मोंदीवर टीका केल्याने ते चर्चेत आलेत. यापार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने त्यांनी 'न्यूजरूम' चर्चेत आमंत्रित केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : एकनाथ खडसेंवर पक्षांतर्गंत अन्यायावरून खा. नाना पटोलेंनी आज पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसेंसाठी वेगळा न्याय का?' असा थेट सवाल त्यांनी पक्षनेतृत्वाला केलाय. खडसेंबाबत ज्येष्ठ नेत्यांनी विचार करण्याची गरज असल्याचंही अपेक्षाही नाना पटोलेंनी व्यक्त केली. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट मोंदीवर टीका केल्याने ते चर्चेत आलेत. यापार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने त्यांनी 'न्यूजरूम' चर्चेत आमंत्रित केलं होतं. त्यांनीही 'आयबीएन लोकमत'च्या अनेक थेट प्रश्नांना अगदी बेधडकपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्याचं सांगतानाच सरकारच्या अनेक शेतकरी विरोधी निर्णयावर अगदी निडरपणे आसूड ओढले.

'शेतकऱ्यांना सरकारने त्वरीत सरसकट कर्जमाफी करावी', ही मागणी पटोलेंनी पुन्हा लावून धरली तसंच सरकार चुकलं तर मी यापुढेही सरकारविरोधात बोलणारच, शेतकऱ्यांची चेष्टा होत असेल तर शांत बसणार नाही, माझं काही चुकत असेल, शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जायला आपण तयार आहोत. असं सांगायलाही पटोले विसरले नाहीत. पटोलेंचं हे बेधडक विधान थेट पक्षनेतृत्वाला आव्हान असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधानांसोबतच्या खासदारांच्या बैठकीत आपण लोकहिताचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते आपल्यावर चिडल्याचंही त्यांनी यावेळी प्रांजळपणे कबुल केलं. मंत्री चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चुकीच्या विधानांचाही यावेळी खरपूस समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी आणि प्रफुल पटेल यांच्या जवळकीबद्दल प्रश्न विचारताच, प्रफुल पटेल हे मागच्या दाराने येणारे खासदार आहेत, अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी त्यांच्यासंदर्भात अधिकचं बोलणं टाळलं. तसंच मुख्यमंत्री आणि मी एकाचवेळी राजकारणात आलो असल्याने आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे त्यांच्याबाबत आकस ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, ते चुकले तर मी बोलणारच पण म्हणून मी काही त्यांच्याविरोधात काही कटकारस्थान करतोय, असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही, असा खुलासाही नाना पटोलेंनी यावेळी केला. गडकरींनीच मला भाजपात आणल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भविष्यात भाजपने कारवाई केली तर काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत जाणार का ? असं विचारताच त्यांनी मी जनता हाच माझा पक्ष असल्याचं सूचक उत्तर देत आपल्या पुढच्या राजकारणी दिशाही स्पष्ट केली.

First published: September 13, 2017, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading