मुख्यमंत्री कुठलाही असो, मुख्यमंत्रिपद मिळालं की बदलतो, नाना पटोलेंची टीका

मुख्यमंत्री कुठलाही असो, मुख्यमंत्रिपद मिळालं की बदलतो, नाना पटोलेंची टीका

केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या खासदारांची सरकारला किंमत नाही, असं वक्तव्य करत भाजपचेच खासदार नाना पटोले यांनी भाजपला घरचा अहेर दिलाय.

  • Share this:

01 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची कीव येते. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या खासदारांची सरकारला  किंमत नाही, असं वक्तव्य करत भाजपचेच खासदार नाना पटोले यांनी भाजपला घरचा अहेर दिलाय. तसंच मुख्यमंत्री विदर्भाचा असो की कुठल्याही भागाचा मुख्यमंत्रीपद मिळालं की तो व्यक्ती बदलतो अशी थेट टीका मुख्यमंत्र्यांवर केली.

नागपूरमध्ये आयोजित विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रृ या कार्यक्रमात भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर टीकास्त्र सोडलंय. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची कीव येते. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या सरकारला खासदारांची किंमत नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

केंद्राच्या निधीबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे विषय उपस्थित केला तर त्यांनी खासदारांची बैठक बोलावणे बंद केलं, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्री विदर्भाचा असो की कुठल्याही भागाचा मुख्यमंत्रीपद मिळालं की तो व्यक्ती बदलतो, अशी थेट टीका नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांनी केलीये.

या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत शेतीचं वास्तव सांगितलं तर मोदी माझ्यावर भडकले असंही पटोले म्हणाले.

First published: September 1, 2017, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading