• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत दिल्लीत महत्त्वपूर्ण घडामोडी, नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत दिल्लीत महत्त्वपूर्ण घडामोडी, नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

पटोले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

  • Share this:
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा होती. विधानसभाा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने तडकाफडकी रात्री उशिरा दिल्लीत बोलावून घेतलं होतं. नाना पटोले हे दिल्लीत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. यावरून हे स्पष्ट झालं की नाना पटोले यांच्या गळ्यामध्ये राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत दिवसभर मिळत होते. नेहमी प्रसार माध्यमांना सामोरे जाणारे नाना पटोले हे प्रसार माध्यमांना टाळत होते. पटोले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा राज्यात आणि दिल्लीत होत आहे. गुजरातचे प्रभारी राजीव सातव आणि नाना पटोले या दोन नेत्यांमध्येच खरी चुरस होती. पण बुधवारी अचानक राज्यात करण्यात येणाऱ्या या नियुक्तीसंदर्भात चक्र फिरायला सुरुवात झाली. सकाळी राज्याचे काँग्रेस प्रभाारी एच के पाटील आणि नाना पटोले यांची जवळपास दोन तास बैठक झाली. ही बैठक कर्नाटक भवन येथे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर हे दोन्ही नेते काँग्रेस संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना भेटण्याकरिता त्यांच्या नर्मदा येथील निवासस्थानी पोहोचले. या भेटीच्या वेळी राज्याातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नावावरती अंतिम निर्णण घेण्यात आल्याची माहिती पुढे आली. यावेळी लंच पे चर्चा या पद्धतीने विस्ताराने राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये विभागीय स्तरीय कार्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचाा निर्णय झाल्याचं समजते. सोबतच ज्या नेत्यांना मंत्रिपद देता आले नाही त्यांची वर्णी कार्याध्यक्षपदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्तमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागेवर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यासंदर्भात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. लवकरच औपचारिकपणे ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
Published by:Akshay Shitole
First published: