नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार

नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार

काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेटही घेतली होती

  • Share this:

08 डिसेंबर:  नाना पटोले लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी  सूत्रांनी दिली आहे.   भंडाऱ्याचे  भाजपचे खासदार नाना पटोले आज  आपल्या खासदारकीचा राजीनामा  दिला आहे. गेले अनेक दिवस नाना पटोले बंडखोर खासदार म्हणून  प्रसिद्ध आहेत.

नाना पटोले त्यांचा राजीनामा संसदेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपवला आहे. सरकारच्या कृषी धोरणावरून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.  गेले अनेक दिवस नाना पटोले भाजपच्या अनेक धोरणांवर टीका करत आहेत. त्यावरून त्यांच्यावर भरपूर टीकाही होत होती. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची  भेटही घेतली होती.  तसंच भाजपच्या जीएसटी  आणि नोटाबंदीवर टीका करणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या अकोल्यात चालू असलेल्या आंदोलनालाही त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे ते लवकरच राजीनामा देणार अशी चर्चा होती. आता  मात्र आजच ते राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे.

भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यावर नाना पटोले पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते काँग्रेस पक्षात सामील होत आहेत असं सध्या तरी दिसतंय

First published: December 8, 2017, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading