देशात काँग्रेसमुळं लोकशाही टिकली - नाना पाटेकर

देशात काँग्रेसमुळं लोकशाही टिकली - नाना पाटेकर

देशात काँग्रेसमुळं लोकशाही टिकली असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलंय. नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते.

  • Share this:

पुणे,ता.05 एप्रिल : आपल्या वक्तव्यामुळं सतत चर्चेत राहणाऱ्या नाना पाटेकरांच्या आणखी एका वक्तव्यामुळं नवी चर्चा सुरू झालीय. कारण नाना पाटेकरांनी वक्तव्यच तसं केलंय. देशात काँग्रेसमुळं लोकशाही टिकली असं  वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलंय. नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. तसंच शरद पवार यांना पंतप्रधानपदी बघण्याची इच्छा असल्याचही अप्रत्यक्षपणे नाना पाटेकर म्हणालेत. यावेळी बोलताना नाना पाटेकरांनी पद्म पुरस्कारावरून काही खेळाडू आणि सिनेतारकांना टोलाही लगावलाय. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते

काँग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणू नका, इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचे आहे असं म्हणत नाना पाटेकर यांनी वर्धापन दिनीच भाजपला टोला लगावला. देवेगौडा पंतप्रधान झाले पण शरद पवार झाले नाहीत. ते मुख्यमंत्री, कृषीमंत्री झाले पण पंतप्रधान होता होता राहिले. एक मराठी माणूस म्हणून पवार पंतप्रधान व्हावेत असं वाटते असंही नानांनी म्हटलंय. सलमान खान ला झालेल्या शिक्षे बाबत कायद्या समोर सर्व समान आहेत एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पद्मश्री देतात अनेकांना ती का देतात ते पण सांगत जा असंही ते म्हणाले. डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे मोठे होते म्हणून भारतरत्न दिलं

पण पैसे कमावणारऱ्या खेळाडू, नट यांना का देतात पद्म सन्मान का देतात  असा बोचरा सवालही नाना पाटेकर यांनी उपास्थित केला

 

First published: April 6, 2018, 10:22 PM IST

ताज्या बातम्या