मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /थेट तुरुंगात रंगला नामकरण सोहळा, पेढे वाटून केलं बारसं, कैदीही भारावले

थेट तुरुंगात रंगला नामकरण सोहळा, पेढे वाटून केलं बारसं, कैदीही भारावले

तुरुंगातील नामकरण सोहळा

तुरुंगातील नामकरण सोहळा

मुंबईत असाच एक अनोखा नामकरण सोहळा पार पडला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

विजय वंजारा, प्रतिनिधी

मुंबई, 21 मार्च : नवजात बाळाचा नामकरण सोहळा हा उत्साहात केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर आपसूकच आनंदाचे वातावरण असते. त्यामुळे नामकरण सोहळ्याचीही प्रत्येकाला उत्सुकता असते. हा नामकरण सोहळा, घरी किंवा एखाद्या मोठ्या हॉलमध्ये नातेवाईक, मित्रपरिवारांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, नवजात बालकांचा नामकरण सोहळा हा चक्क तुरुंगात पार पडलाय, याबाबत तुम्ही ऐकलं किंवा वाचलं आहे का? नाही ना. तर हो. मुंबईत असाच एक अनोखा नामकरण सोहळा पार पडला आहे.

मुंबईतील महिला तुरुंगाची सजविण्यात आलेली भिंत, सगळीकडे लावलेले रंगीबेरंगी फुगे, फुलांच्या माळांनी सजविलेली पाळणी, या हृदयस्पर्शी वातावरणाने तुरुंगातील सर्वच कैदी भारावले होते. दोन बाळांच्या नामकरण विधी सोहळ्याचे औचित्यावर येथील वातावरण चांगलेच खुलले होते. दोन महिला कैद्यांना झालेल्या बाळांचे बारसे मुंबईतील एका तुरुंगात पेढे वाटून करण्यात आले. यावेळी या अनोख्या सोहळ्याला इतर कैदी आणि कारागृहातील कर्मचारी नातेवाईक आणि पाहुणे बनले होते.

मुंबईतील महिला तरुंगात असलेल्या दोन महिला कैदी गर्भवती होत्या. शिक्षा भोगत असतानाच, त्यांच्या पोटी बालकांनी जन्म घेतला. यानंतर आपल्या मुलांचे बारसे करावे, असे त्यांना वाटत होतं. मात्र, तुरुंगात ते शक्य नव्हते. अखेर 'आंगन' या स्वयंसेवी संस्थेने यासाठी पुढाकार घेतला. तुरुंग विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिलांच्या मुलांचे नामकरण करण्याचे ठरले. त्यानुसार सजावट करण्यात आली आणि पाळणेही सजविण्यात आले.

सहावीतील शास्त्रज्ञ! मियावाकी पद्धतीनं करतोय झाडं लावण्यावर संशोधन, पाहा Video

तुरुंगातल्याच पोलीस मावशांनी पाळणे म्हटले आणि बाळांच्या कानात कु... करून मुलाचे नाव सारांश, तर मुलीचे नाव मायशा ठेवल्याचे सांगितले. नामकरण सोहळ्यास उपस्थित महिला कैदी आणि त्यांच्या मातांना खाऊ आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी तसेच महिला कायद्याने कुटुंब प्रमाणे या सोहळ्यात सहभागी होऊन बाळांना आशीर्वाद दिले. दोन बाळांच्या नामकरण विधी सोहळ्याचे औचित्यावर येथील वातावरण चांगलेच खुलले होते.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai police, Small baby