Home /News /maharashtra /

काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 16 मजुरांची नावे समोर

काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 16 मजुरांची नावे समोर

घराची ओढ लागली असताना विसाव्यासाठी ज्या रेल्वे रुळाचा आसरा घेतला तोच रुळ परराज्यातील 16 मजुरांसाठी मृत्यूचा मार्ग ठरला आहे.

औरंगाबाद, 8 मे : कोरोना व्हायरसचं थैमान रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडॉऊन अनेकांसाठी एक वाईट स्वप्न ठरत आहे. सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने एका राज्यातील मजूर दुसऱ्या राज्यात अडकून पडले आहेत. त्यातच घराची ओढ लागली असताना विसाव्यासाठी ज्या रेल्वे रुळाचा आसरा घेतला तोच रुळ परराज्यातील 16 मजुरांसाठी मृत्यूचा मार्ग ठरला आहे. औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर करमाड शिवारात परराज्यातील 16 मजुरांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व मजूर जालन्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. मजुरांनी 45 किलोमीटरचा प्रवास करून करमाड येथे पोहोचले होते. तिथून ते भुसावळला जाऊन स्पेशल ट्रेनने मध्य प्रदेशात जाणार होते. पायी चालून थकलेले मजूर करमाड गावाजवळ रेल्वे रूळावरच थांबले. त्यांना झोप लागली आणि ती त्याच्यासाठी काळझोपच ठरली. मालगाडी येत असल्याचंही त्यांना समजलं नाही. जालन्याकडून आलेली मालगाडी या मजुरांना चिरडून निघून गेली. या अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. करमाड रेल्वे अपघातातील मृत आणि जखमी कामगारांची नावे : मयतांची नावे 1) धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. सहडोल, राज्य - मध्य प्रदेश. 2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश 3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश 4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश 5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्य प्रदेश 6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश 7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्य प्रदेश 8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्य प्रदेश 9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश 10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश 11) संतोष नापित, 12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल. 13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया. 14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश 15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया. 16) दिपक सिंग अशोक सिंग गौड रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश जखमी व्यक्ती :- 1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे रा पोंडी ता जुनावणी जिल्हा मंडल खजेरी जिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:- 1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे वय 20 वर्ष रा. पोवडी ता. घोगरी जिल्हा मांडला 2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर वय 27 वर्ष रा ममान ता पाली जिल्हा उमरिया 3) शिवमानसिंग हिरालाल गौर वय 27 वर्ष रा शाहारगड ता शाही जिल्हा सहडोल संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Aurangabad, Railway accident

पुढील बातम्या