उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री..., ही आहे महाविकासआघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची लिस्ट

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री..., ही आहे महाविकासआघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची लिस्ट

महाविकासआघाडीच्या या सरकारमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर या तीन पक्षांचे नेते राज्याच्या नव्या सरकारमध्ये मंत्री बनतील.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : महाराष्ट्रा(Maharashtra)मध्ये भाजप नेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत महाविकासआघाडीचं (Shiv Sena-NCP and Congress government)सरकार आणण्याच्या तयारीत आहे. महाविकासआघाडीच्या या सरकारमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर या तीन पक्षांचे नेते राज्याच्या नव्या सरकारमध्ये मंत्री बनतील. न्यूज 18च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन पक्षांतील एकूण 26 प्रमुख नेत्यांची नावं समोर आली आहेत, जे मंत्री होऊ शकतात. यात शिवसेनेच्या 8 नेत्यांची नावं असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याही काही नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी समोर आली आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार तर मग उपमुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार यावर सध्या दोन नावं पुढे येत आहेत. जयंत पाटील किंवा बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांच्या नावांची उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे. त्यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

ही आहेत संभाव्य मंत्र्यांची नावं

शिवसेना

एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटिल

राष्ट्रवादी

धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटिल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे

काँग्रेस

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, केसी पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील आणि सुनिल केदार

'भाजप तोंडघशी पडलं'

सु्प्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर भाजपकडे बहुमत नाही हे स्पष्ट झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच भाजपने प्रयत्न केला होता. पण बहुमत नसल्यामुळे भाजप तोंडघशी पडलं आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे भाजपला इन कॅमेऱ्यात बहुमत सिद्ध करणे अशक्य होतं. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिला. हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे, असंही मलिक म्हणाले.

इतर बातम्या - धावत्या कारमध्ये तरुणीवर केला बलात्कार, रस्त्यात फेकून आरोपी फरार

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री!

महाविकासआघाडीच्या गटनेतेपदाची निवड होणार आहे.  शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार आहे. उद्धव यांनीही होकार कळवला आहे. शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता. भाजपसोबत गेल्यामुळे सेना बिघडली होती. पण, आता सेना मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता 5 वर्ष नाहीतर पुढची अनेक वर्ष मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीचा राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या - राजकारणाला नवं वळण, राजकीय सन्यास घेणार का अजित पवार?

उद्या आमदारांना शपथ

दरम्यान, विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास  कोळंबकर यांची नियुक्ती झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी गोपनियतीच शपथ दिली जाणार आहे.

अजित पवार- देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा

विश्वासदर्शक ठरावाआधीच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी भाजपचा पाठिंबा काढला. त्यामुळे भाजपकडे बहुमत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, राजकारणातली BIG BREAKING

First published: November 26, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading