सोलापुरात 'नामांतर' वाद पेटला; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

सोलापुरात 'नामांतर' वाद पेटला; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

सोलापुर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यायची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली होती. यानंतर सोलापुरात या निर्णयावर हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सोलापूर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांचं नाव देण्यात यावे अशी शिवा संघटनेची २००४ सालापासूनची मागणी आहे

  • Share this:

 सोलापूर, 06 नोव्हेंबर:  सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सोलापुरात नामांतराचा वाद पेटला आहे.  सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलंय.

सोलापुर विद्यापीठाला  अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यायची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली होती. यानंतर सोलापुरात या निर्णयावर हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सोलापूर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांचं नाव देण्यात यावे अशी शिवा संघटनेची २००४ सालापासूनची मागणी आहे.सोलापुरात लिंगायत समाजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. यांचं दैवत सिध्देश्वर आहे तर बसवेश्वर या समाजाचे संस्थापक आहेत.   मात्र  यांच्या नावाची मागणी करणाऱ्या शिवा संघटनेला  विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांनी परस्पर नावाची घोषणा केली.यामुळे  शिवा संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झालेत. येत्या काळात सोलापूर बंद ठेवण्याचा इशाराही शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामर्गही काही काळ रोखून धरला होता.

आता सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटल्यामुळे येत्या काळात हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 6, 2017, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading