Home /News /maharashtra /

पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या पतीने केला घात; 7 वर्षीय मुलीवर दीड महिना अत्याचार

पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या पतीने केला घात; 7 वर्षीय मुलीवर दीड महिना अत्याचार

पाळणाघर लाचवणाऱ्या व्यक्तीनेच चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.

नालासोपारा, 22 मे: सध्याच्या काळात पती-पत्नी हे दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याने घरातील लहान मुलांचा सांभाळा करण्यासाठी पाळणाघरात (Cradle house) ठेवतात. मात्र, आता हेच पाळणाघर सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. कारण, मुंबईच्या शेजारी असलेल्या नालासोपारा (Nalasopara) येथे पाळणाघरातच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (minor girl assault) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेकडे असलेल्या एका पाळणाघरात सात वर्षीय चिमुकलीवर पाळणाघर चालविणाऱ्या महिलेच्या पतीनेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल होताच आरोपी इसमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Sagar Rana Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या; CCTV मधून सत्य उजेडात नालासोपारा पश्चिम येथे राहणारे एक दाम्पत्य नोकरीसाठी घराबाहेर जात असे आणि त्यांच्या घरात लहान मुलीचा सांभाळ करणारं कुणीही नसल्याने या दाम्पत्याने पाळणाघरात चिमुकलीला ठेवलं होतं. मात्र, या पाळणाघरातच तिचा घात झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून या मुलीवर अत्याचार होत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळणाघरात या सात वर्षांच्या मुलीवर गेल्या दीड महिन्यापासून अत्याचार होत होते. पीडित मुलगी जखमी झाल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nalasopara

पुढील बातम्या