VIDEO : स्वत:च्याच घराला आणि गाडीला आग लावून पत्र्यावर चढला तरूण, खळबळजनक कारण समोर

लोक इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतील, याचा नेम नाही, असं म्हटलं जातं.

लोक इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतील, याचा नेम नाही, असं म्हटलं जातं.

  • Share this:
    नालासोपारा, 15 मार्च : अलिकडच्या काळात लोक इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतील, याचा नेम नाही, असं म्हटलं जातं. त्यातूनच मग स्टंटबाजी करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणं असो किंवा तलवारीसारखी शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडिओ करणं असो. मात्र नालासोपाऱ्यामध्ये लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी एका माथेफिरूने स्टंटबाजीचं टोकच गाठलं आहे. नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. 38 वर्षीय धरनेधर तिवारी नामक इसमाने आपल्या राहत्या घराला आणि दुचाकीला आग लावली. घराला आग लावल्यानंतर धरनेधर तिवारी थेट पत्र्यावर चढून बसला. याबाबत स्थानिकांनी माहिती दिली आहे. आग लावण्यात आली त्यावेळी संबंधित तरुणाचे संपूर्ण कुटुंब घरात उपस्थित होते. स्थानिकांच्या मदतीने अग्निशमनच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढून मोठी जीवितहानी टाळली आहे. घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या व्हिडिओ आणि स्थानिकांच्या तक्रारी वरून संपूर्ण घटना उघडकीस येत आहे. हेही वाचा- कोरोनो संशयित जोडपे सार्वजनिक कार्यक्रमात झाले सहभागी, लोकांच्या पोटात भीतीचा गोळा दरम्यान, घटनास्थळी आग लागल्याची खबर मिळताच स्थानिक तुलिंज पोलीस आणि वसई विरार अग्निशमन दल तिथं दाखल झाले आणि तातडीने आग आटोक्यात आणली आहे. पुढील तप्पास तुलिंज पोलीस करत आहे.
    First published: