नालासोपारा स्फोटक प्रकरणाचं समोर आलं जालना कनेक्शन, राजकीय नेत्याची चौकशी

नालासोपारा स्फोटक प्रकरणाचं समोर आलं जालना कनेक्शन, राजकीय नेत्याची चौकशी

एटीएसने जालन्यात मोठी कारवाई केली आहे. एका राजकीय पक्षाच्या फार्म हाऊसची रात्री एटीएसकडून झडती घेण्यात आली.

  • Share this:

जालना, 27 ऑगस्ट : एटीएसने जालन्यात मोठी कारवाई केली आहे. एका राजकीय पक्षाच्या फार्म हाऊसची रात्री एटीएसकडून झडती घेण्यात आली. हे फार्म हाऊस जालनाजवळी रेगावमध्ये आहे. फार्म हाऊसचा मालक असलेल्या राजकीय नेत्यांचीही चौकशी करण्यात आली. पण त्यातील अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. मुंबई एटीएसने नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक केलेल्या श्रीकांत पांगारकर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नालासोपारा स्फोटक प्रकरणात दाभोळकरांपासून ते गौरी लंकेश हत्या प्रकरणापर्यंतचे अनेक धागे-दोरे समोर आले आहेत. यातून नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदूरे आणि त्याचा मित्र श्रीकांत पांगारकर याला औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यांनी त्यांच्या चौकशीत जालन्यातील या फार्म  हाऊसचा उल्लेख केला होता आणि त्यातून एटीएसने ही कारवाई केली आहे. त्यामुळे दाभोळकर हत्ये मागे नालासोपारा, औरंगाबाद ते आता जालनापर्यंत उघड झालं आहे.

दरम्यान, काल डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी सचिन अंदुरेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सचिन अंदुरेला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबादहून सीबीआयनं सचिनच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या केली, असा खळबळजनक दावा सीबीआयनं कोर्टात केलाय. त्यामुळं लंकेश यांच्या हत्येत अंदुरेचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कळसकर, अंदुरेची समोरासमोर चौकशी करण्याची परवानगी द्या अशी विनंती सीबीआयनं कोर्टात केलीये.

औरंगाबादहुन सीबीआयने सचिनच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेलं पिस्तुल गौरी लंकेशच्या हत्येत वापरलेलं पिस्तुल असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. शरद कळसकरची 28 तारखेला पोलीस कोठडी संपतेय तेव्हा त्याला ताब्यात घेऊन सचिन आणि त्याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यातून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटात सचिन अंदुरे सहभागी होता का याचा तपास करण्यात येणार आहे.

या सगळ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई, कर्नाटक, पुणे एटीएस जालन्यात दाखल झाले आहेत. या सगळ्या प्रकरणातील एक-एक गुढ उकलत चाललं आहे, त्यामुळे हा आरोपीचा शोध घेण्याच्या कामाला वेग आला आहे.

 

फाटलेल्या नोटा बदलण्याचा सोपा उपाय, 'RBI'ने सांगितले हे चार नियम

First published: August 27, 2018, 11:19 AM IST

ताज्या बातम्या