Home /News /maharashtra /

Crime News: नालासोपाऱ्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी, लाठी-काठीने मारहाणीचा VIDEO व्हायरल

Crime News: नालासोपाऱ्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी, लाठी-काठीने मारहाणीचा VIDEO व्हायरल

नालासोपाऱ्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी, LIVE VIDEO व्हायरल

नालासोपाऱ्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी, LIVE VIDEO व्हायरल

Nalasopara fight video: नालासोपारा येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे.

नालासोपारा, 21 ऑक्टोबर : तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी (fight between two group) झाल्याची घटना समोर आली आहे. नालासोपारा (Nalaspoara) पूर्वेकडील रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या यशवंत विवा मॉल टाऊनशिप जवळ ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीचा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल (fight video viral) होत आहे. सोसोयटीच्या जागेचा बोर्ड लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, हातात लाठी-काठी घेऊन जमावाने एकाला बेदम मारहाण करत आहेत. या घटनेत आचोले पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 2 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली आहे. पिंपरीत वाईन शॉप चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी वाईन शॉपमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये आणि वाईन शॉप चालकात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली आहे. पिंपरीतील रिगल वाईन्स शॉपमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ग्राहकांनी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानाचीही तोडफोड केली आहे. 700 रुपयांपेक्षा जास्त किमतीची दारू दुकानदाराला मागत असल्याने, झालेल्या वादात ही मारहाण आणि तोडफोड करण्यात आली आहे. दारुड्यांनी हातात लोखंडी पाइप घेऊन रिगल वाईन्सची तोडफोड केली आहे. वाईन शॉप मालकाला दारुडे मारहाण करत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तर दारुडे दुकानाबाहेर तोडफोड करत असतानाची दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत. पिंपरी - चिंचवड शहरातील अशोका थिएटर जवळील रिगल वाईन्समध्ये ही मारहाण आणि तोडफोडीची घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येरवड्यात दोन दुकानांची तोडफोड येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जयप्रकाश नगर येतील किराणा दुकाने दहशत माजविण्याच्या दृष्टीने फोडण्यात आली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. येरवडा भागात दहशत माजविण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटेमोठे प्रकार वारंवार घडत असतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुववस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किराणा दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जण येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामान फोडत असल्याचं सीसीटीव्ही कैद झालं आहे. यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे व असले युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दहशत माजवणाऱ्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime news, Live video viral, Nalasopara

पुढील बातम्या