सोलापूरकरांच्या 'या' उपक्रमामुळे झाडं झाली मुक्त !

सोलापूरकरांच्या 'या' उपक्रमामुळे झाडं झाली मुक्त !

श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जवळपास दोन तासात एक किलो खिळे काढण्यात आले.

  • Share this:

सोलापूर, 11 जून : सोलापूरमधील तरूणांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. झाडांना मारलेले खिळे काढून टाकण्यासाठी 'नेल फ्री ट्री, पेन फ्री ट्री' या उपक्रमाला सुरूवात केली आहे. या तरूणांनी शहरातील विविध भागात जाऊन झाडावर मारण्यात आलेले खिळे काढून टाकत झाडांना खिळे मुक्त केलं आहे.

श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जवळपास दोन तासात एक किलो खिळे काढण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शहरात असलेल्या झाडांचं आयुष्य वाढवणं हा आहे. कारण, झाडांना खिळे मारणे, त्यांना दोरी बांधणे, वाळवी लागणे किंवा तारांनी बांधणे यामुळे त्यांचे आयुष्य कमी होतं असल्यानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

या चळवळीमुळे झाडांच्या वेदना तर कमी होणारच आहेत परंतू स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या उपक्रमालाही हातभार लागणार आहे. यामध्ये सोलापूरातील पुना नाका, अवंती नगर, वसंत विहार, शेळगी परिसरातील स्टेट बँक कॉलनी, दयानंद कॉलेज, प्रियंका चौक, तुळजापुर नाका, हैदराबाद रोड या विविध ठिकाणी झाडांना मारलेले खिळे काढण्यात आले. त्यामुळे या पावसाळ्या झाडांना आता नव्या पालव्या फुटणार आणि झाडं पुन्हा बहरणार असं म्हणायला हरकत नाही.

 

हेही वाचा...

मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही ! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ

VIDEO मुंबई-गोवा महामार्गावरून जातान सावधान ! रस्त्याला पडलंय मोठं भगदाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2018 09:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading