मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेसचा भाजपला दे धक्का, 2 जागेवर फडकवला झेंडा!

नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेसचा भाजपला दे धक्का, 2 जागेवर फडकवला झेंडा!

निवडणुकीपूर्वीच भाजपच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपची मात्र मोठी नाचक्की झाली

नांदेड, 13 डिसेंबर :  नांदेडमधील देगलूर पोटनिवडणुकीत (Deglur Assembly election )  भाजपला (bjp) पराभवाचा सामना करावा लागला होता. पण आता पुन्हा एकदा काँग्रेसने (congress) भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.  नायगाव नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच (Naigaon Municipal Council Election nanded) भाजपला सपशेल माघार घेण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या आहेत.

नायगाव नगरपरिषद निवडणूक होत आहे. पण निवडणूकीपूर्वीच भाजपाच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपाची मात्र मोठी नाचक्की झाली आहे. नांदेड जिल्ह्यात नायगाव, माहूर आणि अर्धापुर नगरपरिषदेची निवडणूक आहे.

ब्रह्मचारी असलेल्या महर्षी वात्स्यायन यांनी 'कामसूत्र' सारखा ग्रंथ कसा लिहिला?

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस होता. नायगाव नगर परिषदेत काँग्रेसचे प्राबल्य आहे. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजेश पवार निवडून आल्याने इथे भाजपाची ताकद वाढली होती. त्यामुळे  नगरपरिषद निवडणुकीत भाजप आमदार राजेश पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. सर्व 17 जागांवर भाजपाने उमेदवार दिले  आहेत.

ओबीसी आरक्षणामुळे 3 जागांवर निवडणूक होणार नाही.  तर 14 पैकी 2 जागावरून भाजपा उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेसने निवडणूकीपूर्वी खाते उघडले आहे. वार्ड क्रमांक 3 मधून सुमन सोनकांबळे आणि वार्ड क्रमांक 9 मधून गीता जाधव ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता 21 डिसेंबर रोजी उर्वरीत 12 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

कोणताच पुरुष तुमच्या जवळ येण्याचीही हिंमत करणार नाही; तरुणीने सांगितला सॉलिड फंड

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Deglur assembly election bopolls 2021) महाविकास आघाडीने बाजी मारली. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.  शेवटच्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर यांना 108840 मते मिळाली तर भाजपच्या सुभाष साबणे (Subhash Sabane) 66907 मते मिळाली. यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी जिंकली आहे. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला गड राखत भाजपला चांगलाच दणका दिला होता.

First published: