नागपूर, 12 जलै : राज्यातील जिल्हापरिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. प्राथमिक शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची स्थिती आहे. नागपूर जिल्हा परिषदेत तब्बल 42 शाळांमध्ये शिक्षक नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नागपूरमध्ये 809 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ते कसे शिकणार असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे. राज्यात शिक्षक भरती झाली नसल्याने रिक्त पदांची संख्या मोठी आहे. यावर उपाय म्हणून सध्या सेवानिवृत्त शिक्षकांनाच मानधनावर नियुक्त करण्याचा मार्गही राज्य सरकारने काढला. पण तरीही शिक्षक नसल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची संतप्त भावना पालकांकडून व्यक्त केली जातेय. खातेवाटपाचा तिढा सुटेना! रोहित पवार म्हणाले,आश्चर्य वाटतं की दादा इथे असताना… सरकारने शिक्षकांच्या पदभरतीसाठी मान्यता दिली नसल्याने, आणि काही शिक्षक निवृत्त झाल्याने ८०९ शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सरकारच्या या धोरणाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. शिक्षकांची संख्या कमी असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी खासगी शाळांकडे जात आहे. मात्र आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







