मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nagpur: आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला दुर्दैवी अंत

Nagpur: आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला दुर्दैवी अंत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Nagpur: नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणानं आपल्या आईला मारहाण केल्यानंतर, काही वेळातच त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

नागपूर, 10 डिसेंबर: घरगुती कारणातून आईसोबत वाद झाल्यानंतर (Son hassle with mother) एका तरुणानं आईला पाईपने बेदम मारहाण (Son beat mother) केल्याची घटना नागपूर (Nagpur) शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आईला मारहाण केल्यानंतर गुन्ह्याची कबुली देण्यासाठी स्वत:च पोलिसांत पोहोचलेल्या तरुणाचा ठाण्यातच अंत झाला आहे. पोलिसांकडे कबुली देत असताना, वेदना असह्य झाल्याने संबंधित तरुणाला हृदयविकाराचा झटका (Died in police station by heart attack) आला आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, पोलीस ठाण्यात देखील खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

रवी पारधी असं मृत पावलेल्या 38 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रवी याचे मंगळवारी घरगुती कारणातून आपल्या आईसोबत वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या तरुणानं आपल्या आईला पाईपने मारहाण केली. त्यामुळे आई घरीच रडत बसली. पण इकडे आईला मारहाण केल्याचा पश्चाताप झाल्याने या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी, असं रवीला वाटलं.

हेही वाचा-संतापजनक! अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवून मारहाण, नग्न व्हिडीओ काढला, मुंबईतील घटना

त्यामुळे तो कपिलनगर पोलीस ठाण्यात स्वत: विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. पोलीस ठाण्यात असतानाच रवीच्या छातीत दुखू लागलं आणि त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि पुढच्याच क्षणात त्याला हृदयविकाराचा झटका आला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. पण रवीला याठिकाणी दाखल केलं असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच रवीला मृत घोषित केलं आहे.

हेही वाचा-रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला लावला अस्थींच्या राखेचा लेप; संशयित ताब्यात

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी सीआयडीला पत्र लिहिलं आहे. या घटनेची सविस्तर माहिती सीआयडीला देण्यात आली असून घटनेची चौकशी करायची असल्यास करू शकता, असंही संबंधित पत्रात म्हटलं आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur